‘रॅमकी’च्या सफाई कामगारांना मिळणार कोटींचा फरक
By Admin | Updated: August 29, 2014 00:31 IST2014-08-29T00:26:45+5:302014-08-29T00:31:16+5:30
मंगळवारी सुनावणी : राज्यातील फरक रकमेचा मोठा निकाल ठरणार

‘रॅमकी’च्या सफाई कामगारांना मिळणार कोटींचा फरक
मुकुंद चेडे , वाशी
येथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची प्रचंड दूरवस्था झाली आहे़ निवासस्थानाला झाडा-झुडपांचा वेढा पडला असून, अनेक निवासस्थानाला गळतीही लागली आहे़ कुटुंबातील व्यक्तींना जीव मुठीत घेऊन परिसरात वावरावे लागत आहे़
वाशी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यासह ५७ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. १९७७ साली पोलीस ठाण्यासह व निवासस्थानाची उभारणी करण्यात आली़ यात तीन अधिकारी व ५४ कर्मचाऱ्यांसाठी केवळ १८ निवासस्थाने आहेत़ इतरांना किरायाच्या खोलीचा आधार घ्यावा लागतो़ सद्यस्थितीत या इमारती पूर्णत: जीर्ण झाल्या आहेत़ शासन प्रत्येकवर्षी इमारतीच्या डागडुजीसाठी हजारो रूपये खर्च करते़ मात्र गुत्तेदार थातूरमातूर काम करून निघून जात असल्याने परिस्थितीत पूर्ववत कायम राहत आहे़ जनतेच्या संरक्षणासह कायद्याच्या अंमलबजावणीसाठी झटणाऱ्या वाशी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची मात्र, आज प्रचंड दूरवस्था आहे़ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जिवमुठीत धरून वावरावे लागत आहे़ पोलिस निरीक्षकांच्या निवासस्थानास गळती लागलेली आहे. मोटार पडल्यामुळे कुपनलिका बंद पडली आहे़ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळाला चार दिवसाआड येणाऱ्या पाण्यावर गुजरण करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे़ परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे, गवत वाढल्यामुळे सापांसह विंचूही मोठ्या प्रमाणात निघत आहे़ शिवाय पोलिस स्टेशनला व निवासस्थानास असलेली संरक्षक भिंत ही अर्ध्यावरच बांधलेली असून, सरंक्षक भिंत न बांधल्यामुळे अतिक्रमणे वाढू लागलेली आहेत.
तहसीलनजीक जागा उपलब्ध
येथील तहसील कार्यालयाजवळ पोलिस ठाणे व व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे़ ही जागा पोलिस विभागाच्या ताब्यात असतानाही अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही़ एकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिवस-रात्र जीव मुठीत घेवून वावरावे लागत असताना दुसरीकडे शासन, प्रशासन जागा असतानाही काम सुरू करण्यात न आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे़
वाशी ठाणे आवारात जागा उपलब्ध असून, तेथे अतिक्रमण झाले आहे़ मोक्याच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाकडे पोलिसांनीच दुर्लक्ष केले आहे़ जागा मोठ्या प्रमाणावर शिल्लक असतानाही पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था होत नसल्याचे दिसून येत आहे़