शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:36 IST

coronavirus, educationsector, school, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार आहेत. त्याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएसद्वारे सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना महाविद्यालयांकडून अकरावी प्रवेशाची तयारी सुरू

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार आहेत. त्याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएसद्वारे सूचना दिल्या आहेत.

अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाच्या प्रक्रियेचा प्रारंभ गुरुवार (दि. ३ डिसेंबर) पासून होणार आहे. त्याची तयारी महाविद्यालयांनी सुरू केली आहे. जिल्हा आणि शहरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याची प्रक्रिया दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाली.

त्यामध्ये शहर वगळता जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील इयत्ता नववी, दहावीचे वर्ग भरले. महापालिकेच्या कोरोना नियंत्रण समितीने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील व्यवस्थेची पाहणी गेल्या तीन दिवसांपूर्वी सुरू केली. या महाविद्यालयांनी कोरोनाच्या उपाययोजना केल्या आहेत. तेथील शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील ३८० शाळा सुरूजिल्ह्यातील ३८० शाळा शुक्रवारपर्यंत सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये एकूण २४१५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ शाळा करवीर तालुक्यात सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पन्हाळा (४७), शिरोळ (३९), चंदगड (३८), कागल (३६), राधानगरी (३४), भुदरगड (३२), शाहूवाडी (२७), हातकणंगले (२६) या तालुक्यांचा क्रम आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर