शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या सभेत राडा; हाणामारी, खुर्च्या, चपलांची फेकाफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:20 IST

गोंधळातच नामांतरास मंजुरी

सरवडे : राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरुस्तीच्या विषयावरून मंजूर, नामंजूर अशा घोषणा देत जोरदार हाणामारी झाली. कोण कोणाला मारते हे कळत नव्हते .खुर्च्यांची व चप्पल फेकून मारली. मंजूर -नामंजूर असा आवाज आणि फक्त गोंधळच ऐकायला येत होता. यामध्ये काही महिलांना धक्का बुक्की झाली. अशा गोंधळात शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ अशा नामकरणास सभासदांनी मंजुरी दिली. या विषयासह विषय पत्रिकेतील सर्व मंजूर झाल्याचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे जाहीर केले. माजी अध्यक्ष व संचालक वसंतराव पाटील यांनी संघाच्या संस्थापक मंडळाच्या यादीत शिवाजीराव खोराटे यांचे नाव नसताना त्यांच्या नावाचा अट्टहास का ?.शिवशंकर असे नाव द्यावे अशी मागणी ५२ गावच्या सभासदांनी केली आहे. खोराटे समर्थक यांनी केलेल्या मारहाणीचा व ठरावाला आम्ही विरोध करून निषेध करतो असे सांगितले.संघाची वार्षिक संघाची ६९ वी वार्षिक सभा खोराटे विद्यालयात झाली. विठ्ठलराव खोराटे अध्यक्षस्थानी होते. सभा दोन वाजता सुरू झाली. विषय पत्रिकेवरून १ ते ६ विषय वाचन सुरू झाले. त्यानंतर ७ नंबरचा विषय राधानगरी तालुका संघाच्या नामविस्ताराचा होता. त्यास अभिजित पाटील यांनी विरोध करून ठराव नामंजूरची घोषणा दिली. त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. मंजूर नामंजूरचा गदारोळ सुरू झाला. खोराटे समर्थक पाटील यांच्या अंगावर धावले. तसे वसंतराव पाटील समर्थकही पुढे सरसावले तसा मोठा गोंधळ थेट व्यासपीठावर गेला व दोन्ही समर्थकांत तुंबळ राडा झाला.

संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे म्हणाले, गतवर्षीच्या सभेत शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी संघ अशा नामकरणावर चर्चा झाली होती. त्यास मंजुरी देण्यासाठी हा विषय ठेवण्यात आला होता. या विषयासह विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. सभेत वसंतराव पाटील व त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालत सभेला गालबोट लावले त्याचा मी निषेध करतो.विरोधी संचालक वसंतराव पाटील म्हणाले , संघ स्थापनेच्या संस्थापक संचालक मंडळात शिवाजीराव खोराटे यांचे कुठेही नाव नाही. तरीही खोराटे यांच्या नावास आमचा विरोध नाही, मात्र संघाच्या विकासात माजी आमदार दिवंगत शंकर धोंडी पाटील यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे संघाला शिवशंकर राधानगरी तालुका शेतकरी संघ असे नाव द्यावे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी ५२ गावांतील सभासदांनी संघाकडे मागणी केली ती सत्तारूढ गटाने धुडकावली. ही मागणी हुकूमशाही पद्धतीने डावलली असून आमच्या मंडळींना खोराटे समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करतो. यावेळी उपाध्यक्षा आनंदी पाटील, संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तात्काळ पोलिस दाखलसभेला अगोदर पोलिस उपस्थित नव्हते. हाणामारी झाल्याचे समजताच पोलिस निरीक्षक संतोष गोरे व सहकारी यांनी तात्काळ भेट दिली. दोन्ही गटाशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती घेतली. मात्र पोलिस ठाण्यात कोणताच गुन्हा नोंद नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीPoliceपोलिस