शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी, तुरुंग अधिकारी महिलेसह दोघे जखमी

By उद्धव गोडसे | Updated: February 26, 2025 18:13 IST

तीन कैद्यांवर गुन्हा

कोल्हापूर : कळंबा कारागृहात मुलाखत कक्षाबाहेर कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. सोमवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या घटनेत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी स्वाती लक्ष्मण जाधवर (वय ४१, रा. शासकीय निवासस्थान, कळंबा कारागृह अधिकारी) यांच्यासह कैदी अमर सतीश माने हा जखमी झाला. जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी करण राजेंद्र पुरी, व्यंकटेश उर्फ विकी संजय जगदाळे आणि ओम मंगेश माने या कैद्यांवर गुन्हा दाखल केला.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी मुलाखत कक्षातून काही कैदी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत होते. त्यावेळी मुलाखत कक्षातून बाहेर पडलेला कैदी अमर सतीश माने याला करण पुरी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना सुमित स्वार्थिक कांबळे आणि सादिक जॉन पिटर हे दोघे कैदी वाद सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी व्यंकटेश उर्फ विकी जगदाळे आणि ओम माने या दोघांनी कांबळे आणि पिटर यांना मारहाण केली.

यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी स्वाती जाधवर यांना करण पुरी याने ढकलून खाली पाडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ तुरुंग अधिका-यांनी हाणामारी करणा-या कैद्यांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये पाठवले. तुरुंगाची शिस्त बिघडवणा-या कैद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे तुरुंग अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrisonतुरुंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस