शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:54 IST

केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे जबरदस्तीने पैसे मागण्यापासून रोखल्यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथीयाने शिवीगाळ करत थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात चप्पलेने मारहाण केली. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर परिसरात ही घटना घडली. एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी केवळे अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने नागरीकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दाभोळकर कॉर्नर पासून सासने ग्राउंडकडे जाणाऱ्या एका डोसा व्यावसायीकाकडे तीन तृतीयपंथी पैसे मागत होते. यावेळी त्या व्यावसायीकाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तीन पैकी एका तृतीयपंथ्याने दुकानामध्ये गोंधळ घालून दुकानदार व त्याच्या पत्नीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेथील नागरीकांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना तसेच ११२ या हेल्पलाईन नंबरला दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तीनही तृतीयपंथ्यांना तेथून जाण्यासाठी विनंती केली. दोन तृतीयपंथी तेथून निघून गेले मात्र एका तृतीयपंथ्याने तेथील विक्रेत्यासोबत हुज्जत घालणे सुरुच ठेवले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्या तृतीयपंथ्यास - हटकण्याचा प्रयत्न करत असताना त्या तृतीयपंथ्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या तृतीयपंथ्यास 'चांगलाच पोलीसी खाक्या दाखविला. मात्र त्या तृतीयपंथ्याने संबंधीत कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर चप्पल आणी दगडाने हल्ला चढविला. सुमारे १५ ते २० मिनीटे हा प्रकार सुरु होता. अन्य दोन तृतीयपंथ्यांनी त्या तृतीयपंथ्यास बाजूला नेल्यानंतरे या प्रकारावर पडदा पडला. मात्र एवढी मोठी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे नागरीकांच्यातून आश्चर्य व्यक्त होत आहे.