विकासकामांकडे नागरिकांनी सजगपणे लक्ष द्यावे : आमदार चंद्रकांत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST2020-12-11T04:50:27+5:302020-12-11T04:50:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. थेट पाईपलाईन, अमृत ...

Citizens should pay careful attention to development works: MLA Chandrakant Jadhav | विकासकामांकडे नागरिकांनी सजगपणे लक्ष द्यावे : आमदार चंद्रकांत जाधव

विकासकामांकडे नागरिकांनी सजगपणे लक्ष द्यावे : आमदार चंद्रकांत जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. थेट पाईपलाईन, अमृत योजनेसह शहरात सुरू असलेल्या विविध योजनांच्या कामाला गती दिली. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाचे नियोजन केले जात आहे. विकासकामे दर्जेदार व्हावीत याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, याकडे भागातील नागरिकांनीही लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.

साईक्स एक्स्टेन्शन प्रभागातील रस्ता डांबरीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार स्थानिक विकास निधीतून राजारामपुरी तिसरी गल्ली येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार जाधव यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला व विकासकामांबद्दल नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

याप्रसंगी उपमहापौर संजय मोहिते, दुर्गेश लिंग्रस, अनिल घाटगे, अनुप पाटील, विनायक सूर्यवंशी, अनिल कदम, जयेश ओसवाल, कमलाकर जगदाळे, काका जाधव, डॉ. नीता पिलाई, प्रदीप काटे, हणमंत पोवार, हेमंत मोसल, किरण पोवार, अमित पोवार, अवधूत आरगे, सुनील भोसले, अविनाश माळी, आदी उपस्थित होते.

१०१२२०२०-कोल-एमएलए जाधव

कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधीतून साईक्स एक्स्टेन्शन प्रभागातील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Citizens should pay careful attention to development works: MLA Chandrakant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.