नागरिकांनो, आरोग्य यंत्रणेस सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:52+5:302021-05-07T04:24:52+5:30
उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मुमेवाडी येथील कोविड केअर सेंटर भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधक ...

नागरिकांनो, आरोग्य यंत्रणेस सहकार्य करा
उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मुमेवाडी येथील कोविड केअर सेंटर भेटीवेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धता, पुरवठा व लसीकरणाबाबत माहिती घेतली. आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देत ते म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा वेग वाढत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्व्हे करण्यासाठी आल्यानंतर त्यांना घरातील आजारी व्यक्तींची माहिती सांगितली जात नाही. मात्र, त्यामुळे संसर्ग वाढत आहे. नागरिकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे बाधित रुग्ण वेळेत ओळखता येत नाहीत. शेवटच्या टप्प्यात हा रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतो व रुग्णाचा जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्राथमिक अवस्थेत असलेल्या आजारपणाची माहिती आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहनही घाटगे यांनी केले.
फोटो ओळी : उत्तूर-मुमेवाडी येथील कोविड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्रास दिली भेट.
क्रमांक : ०६०५२०२१-गड-०५