शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थरारक पाठलाग करून चेन स्नॅचरला नागरिकांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 13:35 IST

  कोल्हापूर : महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून भरधाव वेगाने पळ काढणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याला नागरिकांनी थरारक पाठलाग करून ...

ठळक मुद्देथरारक पाठलाग करून चेन स्नॅचरला नागरिकांनी पकडलेनागाळा पार्क येथील घटना, चोरटा उच्चशिक्षीत

 कोल्हापूर : महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून भरधाव वेगाने पळ काढणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याला नागरिकांनी थरारक पाठलाग करून पकडले. त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना नागोबा मंदिर ते नागाळा कमान या आतील रस्त्यावर बुधवारी दुपारी घडली. पंकज बाबासाहेब पाटील (वय २१, रा. वडणगे पाडळी, ता. करवीर) असे त्या चोरट्याचे नाव आहे. त्याची दुचाकीही जप्त करण्यात आली.शहरात गेले दोन महिने चेन स्नॅचिंगचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर शहरात बुधवारी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली.

दरम्यान, वैशाली विजय लोखंडे (वय २७, रा. शाहूनगर, कसबा बावडा, मूळ रा. कनाननगर) ही मोलमजुरी करणारी महिला नागाळा पार्क परिसरातील नागोबा मंदिरकडून कमानीकडे पायी जात होत्या. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून चोरले.

महिलेने आरडाओरडा केला. चोरट्याने भरधाव वेगाने दुचाकीवरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. पाठलाग सुरू असल्याचे पाहून गोंधळलेला चोरट्याची दुचाकी रस्त्यावर घसरल्याने तो खाली पडला. पाठोपाठ नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार प्रकाश भंडारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता चोरलेले मंगळसूत्र त्याच्या खिशात सापडले. नागरिकांनी चोपल्यामुळे व दुचाकीवरून पडल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर, हाता-पायाला जखमा झाल्या होत्या. त्याने आपले नाव पंकज पाटील असल्याचे सांगितले, त्याला अटक करण्यात आली आहे.चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताशहरात गेल्या दोन महिन्यांत कनानगर, राजारामपुरी, सानेगुरुजी वसाहत, रिंगरोड आदी परिसरात महिलांच्या अंगावरील दागिने हिसडा मारून दुचाकीवरून भरधाव वेगाने पळून गेलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. पंकज पाटील याला पकडल्यामुळे त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांच्या केलेल्या अनेक चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.चोरटा उच्चशिक्षीतपंकज पाटील हा उच्चशिक्षित आहे. तो सध्या बी, एस‌्सी. (ॲग्री)च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे, तो चांगल्या घराण्यातील असून तोंडावर मास्क बांधून चैनीसाठी चेन स्नॅचिंग करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या आणखी एका साथीदाराला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून त्या दोघांकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस