शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चोरट्यांनी ताळतंत्र सोडले, हाताला लागेल ते उचलले; चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण

By उद्धव गोडसे | Updated: September 12, 2023 15:09 IST

भुरट्या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

कोल्हापूर : घरफोड्या, दुचाकी चो-या आणि मोबाइल चोरीच्या घटना वाढत असतानाच भुरट्या चो-यांमुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतातील विद्युत पंप, केबल, जनावरे, बांधकामाचे साहित्य यासह हाताला लागेल ती वस्तू पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भुरट्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.किणी (ता. चंदगड) येथे मारुती सटुप्पा मनवाडकर (वय ६२) यांच्या घराच्या खाप-या काढून चोरट्यांनी एक भरलेला गॅस सिलिंडर, एक रिकामा गॅस सिलिंडर, तांब्याच्या दोन कळशा, हंडा, दोन टेबल फॅन आणि खाद्य तेलाचा १५ किलोचा डबा असा दहा हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत त्यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री सरस्वती विद्यालयातील दोन स्मार्ट टीव्ही, एक लॅपटॉप आणि शालेय पोषण आहारातील ५० किलो तांदळाचे पोते असा ३४ हजार २५० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी पळवले. हा प्रकार सोमवारी (दि. ११) सकाळी निदर्शनास आला. याबाबत बाळासाहेब मुरारी वालीकर (वय ४९, रा. भडगाव रोड, गडहिंग्लज) यांनी नेसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

इचलकरंजी येथील हत्ती चौकात असलेल्या गोडाऊनमधून चोरट्यांनी ३२ हजार रुपयांच्या डेकोरेशनच्या वायरी, केबल आणि अन्य साहित्य लंपास केले. शनिवारी (९) हा प्रकार लक्षात आला. याबाबत आकाश राजू हावळ (वय २६, रा. हत्ती चौक, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.ग्रामीण भागात शेळ्या, बोकड यासह विद्युत पंप, लोखंडी साहित्य चोरीचे प्रकार सुरूच आहेत. शहरातून रोज किमान दोन ते तीन दुचाकींची चोरी होते. बाजारपेठा, भाजी मंडई, बस स्थानकातून महिलांचे दागिने लंपास केले जातात. यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस