शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दुर्देवी घटनांत दोन बालकांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:05 IST

म्हाकवे (जि. कोल्हापूर ) : बानगे (ता. कागल) येथील सोहम पृथ्वीराज पाटील (वय ५) याचा कणेरी (ता. करवीर) येथे ...

म्हाकवे (जि. कोल्हापूर) : बानगे (ता. कागल) येथील सोहम पृथ्वीराज पाटील (वय ५) याचा कणेरी (ता. करवीर) येथे खेळता खेळता घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली.पृथ्वीराज पाटील हे पत्नी, सोहमसह कणेरी येथे नातेवाइकांकडे आले होते. सोहम खेळता खेळता घरासमोरील असणाऱ्या पाण्याच्या हौदात पडला. बराच वेळ तो घरात इकडे तिकडे न दिसल्याने सर्वांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी घरासमोरील हौदाचे झाकण अर्धवट उघडे असल्याचे दिसले. हौदामध्ये पाहिले असता सोहम दिसून आला. त्याला उपचारासाठी तत्काळ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षीय बालिकेचा मृत्यूनेसरी : नेसरी-सांबरे मार्गावर नेसरी हद्दीत असलेल्या घरामागील पाण्याच्या टाकीत पडून ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. १६) सकाळी घडली. चांदणी सुरेश खिटन (वय ५, रा. नेसरी ता. गडहिंग्लज) असे मृत बालिकेचे नाव आहे.चांदणी ही सकाळी सुमारे सव्वा नऊच्या सुमारास घरात खेळत असताना घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीत पडली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Two Tragic Incidents Claim Lives of Two Children by Drowning

Web Summary : Two heartbreaking incidents in Kolhapur district resulted in the drowning deaths of two young children. A five-year-old boy fell into a water tank in Kaneri, and a five-year-old girl drowned in a water tank behind her house in Nesari. Both children were declared dead upon arrival at the hospital.