शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: मुलांना डोळ्यात साठवत डोळे मिटले..आई-बापाच्या वादात मुलं झाली पोरकी; हुबाळे कुटुंबाची शोकांतिका

By उद्धव गोडसे | Updated: February 18, 2026 12:49 IST

मुलांच्या भविष्यासाठी ती पतीच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत होती. पण,

उद्धव गोडसेकोल्हापूर : प्रेमविवाहानंतर १३ वर्षांनी कौटुंबिक वादाचे निमित्त ठरले अन् रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत पत्नीचा जीव गेला. आई जिवानिशी गेली आणि वडील तुरुंगात गेल्याने १२ वर्षीय मुलगी आणि नऊ वर्षीय मुलगा आई-वडिलांच्या मायेला पोरके झाले. शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौकात राहणाऱ्या हुबाळे कुटुंबीयांच्या शोकांतिकेने शहरात हळहळ व्यक्त आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!सोन्या मारुती चौकात राहणाऱ्या गणेश हुबाळे याचा बिंदू चौकात फेटे विक्रीचा व्यवसाय आहे. राजकीय सभा, कार्यक्रमांमध्ये नेत्यांना फेटे बांधण्यात पटाईत असलेल्या गणेशची राजकीय वर्तुळात उठबस असते. गंगावेशीतील भाचीच्या माध्यमातून त्याची राजोपाध्येनगर येथे राहणाऱ्या स्वाती दगडू भाट या तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. स्वातीच्या घरच्यांचा विरोध असतानाही पळवून नेऊन त्याने तिच्याशी विवाह केला. माहेरच्या नातेवाईकांचा विरोध डावलून प्रेमविवाह केल्याने स्वातीला माहेरची वाट तुटली. दोन मुलं झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील विरोध मावळला आणि माहेरी येणे-जाणे सुरू झाले.गेल्या तीन-चार वर्षांपासून या दाम्पत्यात वाद सुरू झाला. पतीचे काही महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा स्वातीचा आरोप होता. यातून त्याने सोन्याची चेन विकल्याचा आणि एक प्लॉट विकल्याचे तिने आईला सांगितले. मुलगी परिणीती आठवीत, तर मुलगा शिवम पाचवीत शिकतो. दोघेही शिवाजी पेठेतील शाळेत जातात. मुलांच्या भविष्यासाठी ती पतीच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत होती. पण, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिने पतीला जाब विचारला.

वाचा: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुलीयाच रागातून त्याने सात फेब्रुवारीच्या रात्री गळा दाबला. श्वासनलिका आणि स्वरयंत्र दबल्याने ती मरणाच्या दारात पोहोचली. नऊ दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. मुलांकडे पाहून तिचे डोळे भरून येत होते, पण कंठातून शब्द फुटत नव्हते. अखेर मुलांना डोळ्यांत साठवत तिने डोळे मिटले.

मुलांवर आभाळ कोसळलेआईच्या मृत्यूमुळे मुलांवरील मायेचे छत्र हरवले. यातच वडिलांना अटक झाल्यामुळे ते आई-वडिलांना पोरके झाले. सध्या ते सोन्या मारुती चौकात आजीकडे राहत आहेत. काही दिवसांत त्यांच्यासाठी सगळं जग बदललं. त्यामुळे त्यांच्या दु:खाला पारावार उरलेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Marital Dispute Leaves Children Orphaned; Hubale Family Tragedy

Web Summary : A Kolhapur couple's marital discord ended tragically with the wife's death after a violent altercation. The husband's arrest leaves their two children orphaned, now living with their grandmother, their world irrevocably changed.