शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- धक्कादायक! वय अवघे १५ वर्षे, अन् झाली प्रसूती; वय लपवण्यासाठी बनावट आधार कार्डचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:17 IST

पोलिसांनीही आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून काढता पाय घेतला. मात्र, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या नातेवाइकांनी केलेली बनावटगिरी उघडकीस आणली.

कोल्हापूर : अवघ्या १५ वर्षे सात महिने वयाच्या विवाहितेने अर्भकाला जन्म दिल्याचा प्रकार बुधवारी (दि. ८) कसबा बावडा येथील एका खासगी रुग्णालयात घडला. मुलीचे खरे वय लपवण्यासाठी तिच्या नातेवाइकांनी बनावट आधार कार्डचा आधार घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. महिला व बाल विकास विभागाच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील एका खासगी रुग्णालयात अल्पवयीन विवाहितेने अर्भकाला जन्म दिल्याची माहिती मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी बुधवारी सकाळी महिला व बाल विकास विभागासह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने संबंधित रुग्णालयात संयुक्त तपासणी करण्यात आली. त्यावेळी आढळलेल्या संशयित विवाहितेच्या आधार कार्डची पाहणी केली असता, त्यानुसार विवाहितेचे वय १९ वर्ष होते.मात्र, तिच्या आईला मुलीच्या जन्म तारखेबद्दल ठोस माहिती देता न आल्याने पथकाचा संशय बळावला. पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित विवाहिता शिक्षण घेत असलेल्या पलूस (जि. सांगली) येथील मदरशातून जन्म दाखल्याची मागणी केली. त्या दाखल्यानुसार विवाहितेची खरी जन्मतारीख एक सप्टेंबर २००७ असल्याचे स्पष्ट झाले.बाल संरक्षण अधिकारी सागर दाते, अभिमन्यू पुजारी, महेंद्र कांबळे, अतुल चौगले, अस्मिता पोवार, भाग्यश्री दलवाई, जुबेर शिकलगार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.सासर कर्नाटकातपीडित मुलीचा विवाह २०२० मध्ये झाला असून, तिचे सासर मंंगसुळी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) हे आहे. प्रसूतीसाठी ती माहेरी कसबा बावड्यात आली होती. बनावट आधार कार्डच्या सहाय्याने ती गेल्या दोन महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होती, अशी माहिती चौकशीत पुढे आली. अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिला अर्भकाला जन्म देण्यास भाग पाडल्याचा अहवाल महिला व बाल विकास विभागाने बाल कल्याण समितीला सादर केला. त्यानुसार पीडित विवाहितेच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.नातेवाइकांचा बनावकारवाई टाळण्यासाठी पीडित अल्पवयीन विवाहितेच्या नातेवाइकांनी बनावट आधार कार्ड तयार करून घेतले होते. बुधवारी पथकाने चौकशी केली असता, नातेवाइकांना ठामपणे विवाहितेचे वय १९ असल्याचे सांगितले. पोलिसांनीही आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून काढता पाय घेतला. मात्र, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या नातेवाइकांनी केलेली बनावटगिरी उघडकीस आणली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPregnancyप्रेग्नंसी