शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: फुगा फुटला श्वसननलिकेत अडकला; बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:57 IST

इचलकरंजी : येथील काजवे हॉस्पिटल परिसरात फुगा फुगवून खेळताना तो फुटून श्वासनलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

इचलकरंजी : येथील काजवे हॉस्पिटल परिसरात फुगा फुगवून खेळताना तो फुटून श्वासनलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गौरांश अमित लगारे असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अमित लगारे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा गाडा आहे. ते कुटुंबीयांसह काजवे हॉस्पिटल परिसरात भाड्याने राहतात. मंगळवारी सकाळी अमित यांचा मुलगा गौरांश हा मित्रांसोबत फुगे घेऊन खेळत होता. फुगा फुगविताना तो फुटला आणि गौरांशच्या श्वासनलिकेमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्याला नातेवाइकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई - वडील व बहीण असा परिवार आहे. यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाइक आणि भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती घेऊन घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू