बोरगाव पुलासंदर्भात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-14T00:57:57+5:302014-07-14T01:00:25+5:30
बंधारा झाला कुमकुवत

बोरगाव पुलासंदर्भात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज, रविवारी पहाटे पाण्याखाली गेला. कोगे व शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून कोदे धरण क्षेत्रात सर्वाधिक २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गगनबावडा, राधानगरीसह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली तर भुदरगड, शाहूवाडी, आजरासह करवीर तालुक्यातही दमदार पावसामुळे बळिराजासह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शिरोळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पंचगंगा, कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत आहेत. कागल शहर आणि परिसरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पन्हाळ्यात पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला आहे.
गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी
राजाराम बंधारा पाण्याखाली : धरण क्षेत्रांत धुवाधार; बळिराजासह जिल्हावासीयांत समाधान
कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज, पहाटेच पाण्याखाली गेला. कोगे व शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, कोदे धरण क्षेत्रात सर्वाधिक २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर वाढू लागला आहे. शनिवारी रात्रभर जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू होता. आज, रविवारी सकाळी थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सुरुवात केली. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाबरोबर वारेही वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. जिल्ह्यात पाऊस जोरात सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी एका दिवसात पाच फुटांनी वाढली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात १२७.५०, चंदगडमध्ये ६८.३३, भुदरगडमध्ये ५०.८०, राधानगरीमध्ये ५३.५०, शाहूवाडीमध्ये ३९, आजरा येथे ४०.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज १७.५ फुटांवर पातळी राहिली आहे. पंचगंगा नदीवरील वडणगे- कसबा बावडा यांना जोडणारा राजाराम बंधारा पहाटेच पाण्याखाली गेला. सध्या या बंधाऱ्यावर दोन फूट पाणी आहे. त्यातून वाहतूक मात्र सुरू आहे.
धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरीत १६७ मिलीमीटर, घटप्रभा १७९, तर पाटगाव धरण क्षेत्रात १६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ३१ टक्के, वारणा ३६ टक्के तर दूधगंगा २२ टक्के भरले आहे.