मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:18 IST2020-01-17T19:14:38+5:302020-01-17T19:18:03+5:30
कोल्हापूर : मुख्य मंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आज आगमन झाले. सार्वजनिक आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी ...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आज आगमन झाले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, विजय देवणे आदी मान्यवर उपस्थित होते.