शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, उद्या मुंबईत ‘वर्षा’वर बैठक; नेमकं काय घडलं..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:19 IST

आमदार राहुल आवाडे यांची माहिती, कार्यकर्त्यांनी कोणताही अप्रिय निर्णय घेऊ नये

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने तब्बल ३ टप्प्यांवरील बैठकांनंतर मुंबईतील निश्चित केलेली यादी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली. यादीमधील काही नावांबद्दल त्रुटी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेतून दोन दिवसांत संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्यानंतर रविवारी (दि. २८) वर्षा निवासस्थानी बैठक होऊन फायनल यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.आमदार आवाडे यांच्यासह माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी ६५ जागांसाठी ४२९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर स्थानिक सर्व्हे आणि चर्चेतून ६० नावे निश्चित केली. त्यावर इचलकरंजी, सांगली आणि मुंबई अशा तीन टप्प्यांवर बैठका झाल्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सर्व्हेनुसार आम्ही दिलेल्या नावांची चाचपणी झाली. ९० टक्के मिळतीजुळती नावेच निश्चित करण्यात आली. त्यानुसार संबंधितांना निरोप देण्यात आला.

वाचा : भाजपच्या एका कार्यकर्त्याची उमेदवारी नाकारली, महिला रस्त्यावर उतरुन लागल्या रडूया निरोपानंतर काही जण नाराज झाले. त्यामध्ये पक्षासोबत नेहमी असणारे उमेदवारीपासून वंचित राहिले. याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांच्याशी आणि पार्टीशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तींच्या आणि यंत्रणेच्या माध्यमातून माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिली आहे. ते स्वत: शहरातील उमेदवार, स्थानिक परिस्थिती याबाबत त्यांच्या यंत्रणेकडून माहिती घेतील आणि त्यानंतर फायनल यादी जाहीर करतील.सर्वांनी एकमताने तयार केलेली अ, ब, क, ड अशी गटनिहाय संपूर्ण नावांची यादी मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चेला ठेवली जाणार आहे. त्यावर त्यांच्या यंत्रणेमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा चाचपणी करून फायनल यादी जाहीर केली जाईल. पूर्ण यादीत बदल होणार नसून, काही ठराविक जागांबाबत तडजोडी होऊ शकतात, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.

महायुतीची चर्चाराष्टवादीसोबत आमची पुन्हा चर्चा झाली नाही, तेही चर्चेला आले नाहीत. परंतु आमचे आणि शिंदेसेनेचे बोलणे सुरू आहे. शुक्रवारीही आमची बैठक झाली. त्यांच्याकडील काही जागा निश्चित करण्यात आल्या असून, उर्वरित जागांवरही लवकरच निर्णय होईल. दरम्यान, मुंबईतील बैठकीनंतर बरेचसे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी कोणताही अप्रिय निर्णय घेऊ नयेएकूण ४२९ उमेदवारांतून ६५ जागांसाठी नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे काहींना थांबावे लागेल. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्याठिकाणी उमेदवारी चुकली, तेथे फटका बसला आहे. त्यामुळे प्रत्येक जागेबाबत अतिशय जागरूकपणे चाचपणी करून उमेदवार निश्चित केले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाईगडबडीत कोणताही वेगळा अथवा चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन आवाडे यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji BJP List Halted; CM Reviewing, Meeting Scheduled in Mumbai

Web Summary : Maharashtra CM put Ichalkaranji BJP's election list on hold. Disgruntled members and internal reports prompted review. Final list after Mumbai meeting.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर