शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडेंचं बंड थंड केले, धैर्यशील मानेंचा अर्ज भरायला सोबत घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 14:16 IST

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा करणारे  अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा करणारे  अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. शनिवारी (दि.१३) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही निवडणूक लढवणार असल्याचे आवडेंनी सांगितले होते. मात्र आज, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आवडेंचे बंड शमले. यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांसोबत गेले.प्रकाश आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, रामदास कदम यांच्यासह पोहोचले. यावेळी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत यांची मनधरणी केली. अन् अखेर त्याला यश आले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला आवाडे यांनी उघड विरोध केला होता. उमेदवार बदलण्याची थेट मागणी देखील केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यासर्व घडामोडीनंतर आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा लढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र सर्व्हेनुसार प्रकाश आवाडेंना पसंती असल्याचे समोर आल्याने प्रकाश आवडेंनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला होता. आवाडे हातकणंगलेमधून उभे राहिले असते तर मतविभागणामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना धोका होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान जोडण्या लावल्या. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जनसुराज्य आमदार विनय कोरे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाडे यांची मनधरणी करण्यात यश आल्याने माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Awadeप्रकाश आवाडेEknath Shindeएकनाथ शिंदेdhairyasheel maneधैर्यशील माने