शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरतात - श्रीकांत शिंदे

By समीर देशपांडे | Updated: April 30, 2024 12:51 IST

कोल्हापूर : कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. मग ती नगरपालिका, महापालिका, विधानसभा असो किंवा लोकसभा. त्यासाठी कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात ...

कोल्हापूर: कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. मग ती नगरपालिका, महापालिका, विधानसभा असो किंवा लोकसभा. त्यासाठी कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरायचे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाची पध्दत आहे. त्यामुळेच ठाणे आणि परिसरावर इतके वर्षे युती, महायुतीचे वर्चस्व आहे. याच भूमिकेतून आपल्याला ज्यांनी बळ दिले अशा लोकसभा उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी ते कोल्हापुरात येत आहेत. याबद्दल कोणी काही आरोप केले तर त्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शिंदे यांच्या या मुक्कामावर आमदार सतेज पाटील यांनी टीका केली होती. शिंदे म्हणाले, कोल्हापूरवर आम्ही निवडणुकीपुरते प्रेम करणारे नाही. महापूर, कोरोनामध्येही एकनाथ शिंदे यांनी इथे तळ ठोकला होता. येथे फुटबॉल अकादमीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम सुरू होईल. पावनखिंड मार्गावर मुक्कामाच्या सुविधा निर्माण करण्याची शिवभक्तांची मागणी होती. गेली अनेक वर्षे याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतू आता या कामाला सुरूवात होत आहे. शहरातील रस्ते, कन्व्हेशन सेंटर, रंकाळा, अंबाबाई तीर्थक्षेत्रासाठी निधी अस महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कोणताही भावनिक मुद्दा न करता विकासाच्या कामावर नागरिकांनी मतदान करावे. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, याआधीच्या पालकमंत्र्यांनी इथे टोल आणला आणि आम्हांला तो भागवावा लागला. यावेळी धैर्यशील माने, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते.

असा नेता पाहिला नसल्याने अप्रूपमुख्यमंत्रीपदावर असलेला नेता आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी इतका दिवसरात्र राबतो असे चित्र यापूर्वी कधीच कोल्हापूरकरांनी पाहिले नव्हते. त्यामुळे शिंदे यांचा कोल्हापुरातील मुक्काम चर्चेत आल्याचे यावेळी धैर्यशील माने यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shrikant Shindeश्रीकांत शिंदे