शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांनी लोकसभेला जोडा दाखवला, विसरलात का?; सतेज पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:29 IST

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात, हे त्यांनाच समजत नाही'

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात, हे त्यांनाच समजत नाही. विरोधकांना जोडा दाखवा म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत सहा दिवस येथे तळ ठोकूनही कोल्हापूरकरांनीच जोडा दाखवला हे ते विसरले आहेत, असा पलटवार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा करून आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असून, हा लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूरबंदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह युती सरकारवर निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरकरांना प्रेमाने, आपुलकीने व बंधुभावाने जिंकता येते. पण, मुख्यमंत्र्यांची भाषा काय आहे? लोकसभेला १०० टक्के येथील जनतेने दाखवून दिले, आगामी निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल. कोल्हापूरकरांचा दणका पाहून शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असून, कोल्हापूरकर लढा चालूच ठेवणार आहेत.

अशांत कोल्हापूरचा प्रयत्नमध्यंतरी मुंबईत एक उद्योगपती भेटल्यानंतर त्यांनी विचारले ‘कोल्हापूर शांत आहे ना?’ यावरून ‘अशांत कोल्हापूर’ अशी प्रतिमा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

जनसुरक्षा कायद्याविषयी वकील परिषद

लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरायचे नाही, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असून, जनसुरक्षा कायदा किती चुकीचा आहे? याविषयी प्रबोधन करण्यासाठी लवकरच वकील परिषदेचे आयोजन केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.पोलिसांकडून मृतदेहाची विटंबनाशिये येथील दहा वर्षीय बालिकेच्या लैंगिक अत्याचार खून प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत उध्दवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, मृतदेह २४ तास पंचनाम्याविना सीपीआरमध्ये ठेवला जातो, ही मृतदेहाची विटंबना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे