शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Circuit Bench: सरन्यायाधीशांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:23 IST

चार दिवसांपूर्वी खासदार शाहू छत्रपती यांनी गवई यांची भेट घेऊन सर्किट बेंचची आवश्यकता का आहे, याची माहिती देऊन आठवण करून दिली होती

कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू छत्रपती महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हा बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. वकील झालो, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो. ही छत्रपती शाहू महाराजांची कृपा आहे. त्यांचे ऋण फेडता येणे अशक्य आहे. तरीही मी कोल्हापूरसाठी सर्किट बेंच सुरू करून या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, अशी नि:संदिग्ध ग्वाही भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती, गवई यांनी सर्किट बेंच मंजूर करून हा शब्द खरा करून दाखविला.सरन्यायाधीश भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली तेंव्हा ते कोल्हापूरला आले होते. यावेळी त्यांनी न्यू पॅलेसवर खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती. यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती व ॲड. आर. एल. चव्हाण उपस्थित होते. छत्रपती परिवाराने गवई यांचा यथोचित सन्मान केला होता.

वाचा : चार लाख खटल्यांच्या कामकाजाला येणार गतीयावेळी झालेल्या चर्चेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हा बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांचे ऋण आम्हावर आहेत. त्यामुळे कोल्हापूरसाठी काही तरी करण्याची माझी इच्छा आहे. सर्किट बेंचची मागणी पुढे आली आहेच. कोल्हापूरला सर्किट बेंच देण्याच्या मागणीला माझा पाठिंबा राहिल, असे गवई यांनी सांगितले होते.

वाचा: उच्च न्यायालयाचे खंडपीठ-सर्किट बेंचमध्ये फरक काय ?

चार दिवसांपूर्वी खासदार शाहू छत्रपती यांनी गवई यांची भेट घेऊन सर्किट बेंचची आवश्यकता का आहे, याची माहिती देऊन आठवण करून दिली होती. त्यानंतर चार दिवसात नोटिफिकेशन काढून गवई यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली.

संभाजीराजेंना दिली माहिती

शुक्रवारी सरन्यायाधीश भूषण गवई दिल्लीहून नागपूरला विमानाने चालले होते. त्यांच्या शेजारीच संभाजीराजे यांची जागा होती. गवई यांनी संभाजीराजे यांना पाहताच आनंदाची बातमी तुम्हाला देतोय, असे सांगत सर्किट बेंचचे आजच नोटिफिकेशन काढल्याचे सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी खासदार शाहू छत्रपती यांना फोन करून ही बातमी सांगितली.