छावा मित्रमंडळ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:49+5:302021-02-05T07:13:49+5:30
कोल्हापूर : यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सेव्हन साइड हाॅकी स्पर्धेत छावा मित्रमंडळाने तडाका तालीम मंडळचा पराभव करीत ...

छावा मित्रमंडळ प्रथम
कोल्हापूर : यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सेव्हन साइड हाॅकी स्पर्धेत छावा मित्रमंडळाने तडाका तालीम मंडळचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
लाइन बझार मैदानावर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात छावाच्या शुभम जाधव याने दुसऱ्या व सातव्या मिनिटास गोल करीत २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर तडाकाकडून सिद्धार्थ घाटगे याने १२व्या मिनिटास गोल करीत आघाडी २-१ अशी कमी केली. सामन्यांच्या उत्तरार्धात छावाच्या माज सय्यद याने २७ व ३३व्या मिनिटास गोल करीत सामना ४-१ असा जिंकून देत विजेतेपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात छावा मित्रमंडळाने आयआरबी संघाचा २-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली, तर तडाका तालीम संघाने संयुक्त लाइन बझारचा १-० असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सुरेश पारकर, आनंदराव जाधव, विलास निकम, नामदेवराव डोंगरे, योगेश निकम यांच्या उपस्थित झाला. विजेत्या व उपविजेत्या संघास रोख रक्कमेसह चषक देण्यात आला.
उत्कृष्ट खेळाडू - शुभम जाधव (छावा), आदित्य भोसले (तडाका), अभिजित गवळी (संयुक्त लाइन बझार) यांचा गौरव करण्यात आला.
फोटो : २३०१२०२१-कोल-हाॅकी
ओळी : कोल्हापुरातील लाइन बझार हाॅकी मैदानात रविवारी झालेल्या यशवंतराव निकम सेव्हन साइड हाॅकी स्पर्धेत विजेतपद पटकाविलेल्या छावा मित्रमंडळास मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.