शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि कोहिनूर हिरा परत आणू, चंद्रकांत पाटीलांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 21:59 IST

कोल्हापूर :  ज्या ब्रिटिशांनी भारताला दीडशे वर्षे गुलामगिरीत ठेवले, त्या देशाला आपल्या देशाने आर्थिक विकासाच्या क्रमवारीत मागे टाकले आहे. पाचव्या ...

कोल्हापूर :  ज्या ब्रिटिशांनी भारताला दीडशे वर्षे गुलामगिरीत ठेवले, त्या देशाला आपल्या देशाने आर्थिक विकासाच्या क्रमवारीत मागे टाकले आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताने पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल सुरु केली आहे. या टप्प्यावर त्यांच्याकडे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि भारताचा मानबिंदू असलेला कोहिनूर हिरा पुन्हा परत आणू असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या खुल्या सभागृहात तंत्रनिकेतनच्या २८ व्या पदविका प्रदान समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे तंत्रशिक्षणचे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव होते. मयूरा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक रवी डोली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. मान्यवरांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील विविध शाखेतील ६०५ स्नातकांना पदविका प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

कोल्हापूरातील पहिले सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय जूनपासून सुरु होत आहे. यासाठी बार्टीकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले असून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातील वसतीगृहाची दहा एकर जागा लवकरच ताब्यात मिळणार आहे. एआयसीटीईचे पथक लवकरच प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नव्या कॉलेजच्या जागेची पाहणी -नव्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालाची इमारत जेथे बांधण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुपारी केली. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षात कामकाज सुरु करण्यासाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यांच्यासोबत प्राचार्य डॉ. डी. एम. गर्गे, सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता संजय जाधव, करवीरचे प्रांत वैभव नावडकर उपस्थित होते.

यांनी घेतल्या पदविका -स्थापत्य अभियांत्रिकी : १५१ (मे), १२ (डिसेंबर) : १६३

यंत्र अभियांत्रिकी : १६५ (मे), ४ (डिसेंबर) : १६९विद्युत अभियांत्रिकी : ६५ (मे), ४ (डिसेंबर) : ६९

औद्योगिक अणुविद्युत : १३ (मे), १ (डिसेंबर) : १४अणुविदयुत व दूरसंचार : ७६ (मे), १४ (डिसेंबर) :९०

शर्करा तंत्रज्ञान : २ (मे) : २माहिती तंत्रज्ञान : ७६ (मे) : ७६

धातू अभियांत्रिकी : २० (मे), २ (डिसेंबर) : २२एकुण : ५६८ (मे), ३७ (डिसेंबर) : ६०५

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी