शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Kolhapur: जीबीएस सिंड्रोम रोखण्यासाठी पाण्याचे नमुने तपासा, जिल्हास्तरीय बैठकीत सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:13 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोम आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा. ...

कोल्हापूर : जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोम आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जीबीएसबाबत आवश्यक माहिती लोकांना द्या, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी दिल्या. गर्भलिंग निदान विरोधात छापा टाकून एजंट तसेच डॉक्टरांचे नेटवर्क शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करा, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ. फारूख देसाई यांच्यासह समिती सदस्य, तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते. तीन तास झालेल्या बैठकीत कार्तिकेयन यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या.

गर्भलिंग निदान विरोधात धाडी टाकाअवैध गर्भलिंग निदान तपासणी मोहिमेंतर्गत सोनोग्राफी सेंटरची तपासणी करा. मशीनचे एफ फॉर्म तपशीलवार पाहा. पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान तपासणी केली जाते, गर्भपाताची औषधे विकली जातात का याची तपासणी करा. गर्भपातासाठी आलेल्या महिलांचा इतिहास जाणून घ्या.

बोगस डॉक्टरबाबत तक्रार पेटी ठेवाबोगस डॉक्टर तपासणीसाठीची यादी अधिकाऱ्यांना द्या. नवा दवाखाना सुरू करताना वैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा जवळील शासकीय दवाखान्यातील प्रमुखाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यायला सांगा. बोगस डॉक्टर आढळल्यास पोलिस पाटील यांना माहिती द्या. तालुक्याच्या ठिकाणी बोगस डॉक्टरबाबत स्वतंत्र ‘तक्रार पेटी’ ठेवा. तपासणी मोहीम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा.

तंबाखू खाल्ल्यास कारवाईतंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ही मोहीम राबवताना जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागांनी एकत्र जावे. शासकीय कार्यालयात याचे सेवन करणारे अधिकारी कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केल्याचे तपशील द्या. पोलिस, आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाईच्या संख्येत वाढ करावी.

क्षयरोग मुक्त जिल्ह्यासाठी..क्षयरोग निर्मूलन अभियानांतर्गत संदिग्ध रुग्णांच्या एक्स-रे संख्या वाढवा. टीबीमुक्त जिल्हा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. यावेळी झालेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी माहिती दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य