शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:50 IST

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

कोल्हापूर : कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिले होते. मराठा समाज आतुरतेने आरक्षणाची वाट बघत होता. मात्र, सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेत आहेत. मात्र, त्या अधिवेशनात काय चर्चा करणार हे सरकार सांगत नाही. त्यामुळे सरकार केवळ मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.आ. पाटील म्हणाले, सरकार वारंवार मराठा समाजाला तारखा देत असून, मुख्यमंत्री मराठा समाजाची फसवणूक करीत आहेत. एका बाजूला मराठा समाज आरक्षणाची आतुरतेने वाट बघत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सरकार 'तारीख पे तारीख' देत आहे. अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आता मार्चपर्यंत आचारसंहिता लागू शकते. जर २४ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घेता येत नसेल तर सरकारने २४ डिसेंबर तारीख का दिली?

मंत्री छगन भुजबळ यांचे बोलवते धनी कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळले असून, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. सरकारमधील एका मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य थांबवता नाही, याचा अर्थ हे वक्तव्य सरकारचेच समजायचे का? असा सवालही आ. पाटील यांनी केला.देशाची वाटचाल हुकूमशाहीकडेतीन कायदे पास करण्यासाठी भाजप सरकारने विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केले. विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते. भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला, तर तो देशद्रोह ठरू शकतो. म्हणून हा कायदा पास व्हावा यासाठीच खासदारांचे निलंबन केले. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजप सरकारला जागा दाखवेल आणि इंडिया आघाडीला निवडून देईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण