शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- एएस ट्रेडर्स फसवणूक: लोहितसिंग सुभेदारसह पाच जणांवर आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:11 IST

८७१ पानांचे आरोपपत्र, आजवर ३२ जणांवर गुन्हा, १२ जणांवर कारवाई

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (वय ४१, रा. पलूस, जि. सांगली) याच्यासह पाच संशयितांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (दि.१८) जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ८७१ पानांच्या आरोपपत्रात संशयितांचे कारनामे नमूद केले आहेत. आजपर्यंत या गुन्ह्यातील एकूण १२ संशयितांवर आरोपपत्र दाखल झाले, तर ३२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.आरोपपत्र दाखल झालेल्यांमध्ये सुभेदार याच्यासह प्रदीप कल्लाप्पा मड्डे (वय ४८, रा. लोणावळा, जि. पुणे), साहेबराव सुबराव शेळके (वय ६४, रा. जिवबानाना पार्क, कोल्हापूर), नामदेव जिवबा पाटील (वय ४९, रा. खोकुर्ले, ता. गगनबावडा) आणि दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (वय ६४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. यापूर्वी विक्रम जोतिराम नाळे, श्रृतिका वसंतराव सावेकर, सुवर्णा श्रीरंग सरनाईक, बाबासाहेब भूपाल धनगर, बाळासाहेब कृष्णात धनगर, अमित अरुण शिंदे आणि आशिष बाबासाहेब गावडे यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.पुरावे नष्ट करण्याचा आरोपशाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक आणि एजंट यांनी कार्यालयांमधील लॅपटॉप, हार्डडिस्क आणि अन्य कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या लाभातून मिळालेल्या मालमत्तांची विक्री केली. संशयितांनी कट रचून गुंतवणूकदारांची ४४ कोटी ४२ लाख ९६ हजार ९६ रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे.

आरोपींची संख्या वाढणारगुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीसह २७ जणांचा उल्लेख तक्रारदारांनी फिर्यादीत केला होता. पोलिसांच्या तपासात कंपनीचे आणखी काही संचालक, एजंट आणि प्रमोटर यांची नावे समोर येत आहेत. त्यानुसार संशयितांची संख्या वाढत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी काही एजंट रडारवर असल्याचे निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.तक्रारी द्या : पोलिसांचे आवाहनसुमारे दीड हजार कोटींची फसवणूक झालेली असतानाही केवळ ४४ कोटी ४२ लाख रुपयांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या कंपनीवर गुन्हा दाखल होऊन एक वर्ष उलटले असून, यापुढे कोणतेही परतावे मिळणे शक्य नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रारी द्याव्यात, असे आवाहन तपास अधिकारी कळमकर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस