आत्मदहनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:09+5:302020-12-05T04:57:09+5:30
इचलकरंजी : न्यायालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या अमर निवृत्ती मगदूम व त्याला मदत केल्याप्रकरणी अरिफ बशीर मोमीन (दोघे रा. ...

आत्मदहनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी : न्यायालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या अमर निवृत्ती मगदूम व त्याला मदत केल्याप्रकरणी अरिफ बशीर मोमीन (दोघे रा. वेताळ पेठ) या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवळे गल्लीतील जुगार अड्ड्यावर कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकला होता. त्यामध्ये संशयित चौदाजणांना अटक करून गावभाग पोलिसांच्या हवाली केले होते. त्या संशयितांचे पोलिसांनी मुंडण केले. त्यामध्ये अमर याचा समावेश होता. त्या नैराश्येतून अमरने न्यायालयाच्या आवारात रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला मोटारसायकल (एमएच ०९ एएस ७३८२) वरून मोमीन याने न्यायालयात नेले होते. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याने त्याच्यावर दारूबंदी कायद्यासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.