शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: आर्थिक फसवणुकीच्या ३७ पैकी ११ गुन्ह्यांतच आरोपपत्र, तपास संथ गतीने

By उद्धव गोडसे | Updated: February 3, 2025 18:44 IST

अनेक संशयित मोकाटच

उद्धव गोडसेकोल्हापूर : आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण घटत असले, तरी दाखल गुन्ह्यांचा सखोल तपास करणे आणि अटकेतील संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्याची गती संथ आहे. शाहूपुरी पोलिसांनी गेल्या वर्षभरातील ३७ पैकी ११ गुन्ह्यांमधील २३ संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरूच असून, अजूनही अनेक संशयित मोकाट आहेत. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेअर मार्केटशी संबंधित अनेक बोगस कंपन्या, गुंतवणूक सल्लागारांची कार्यालये आणि भामट्यांनी ठाण मांडले होते. कोरोना काळात त्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. वर्षभरातच त्यांचे बिंग फुटले आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेण्यास सुरुवात केली. यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत शाहूपुरी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले होते.२०२२-२३ मध्ये ९० गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू होता. यातील काही मोठे गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवले होते. पोलिसांनी प्राधान्याने या गुन्ह्यांचा तपास करून संशयितांना अटक करण्याचा धडाका लावल्याने फसवणुकीचे प्रकार घटले. २०२४ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे ३७ गुन्हे दाखल झाले.२३ जणांवर आरोपपत्रपोलिसांनी ३७ गुन्ह्यांतील २४ आरोपींना अटक केली. यातील ११ गुन्ह्यांतील २३ जणांवरील आरोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल केले आहे. सध्या यावरील सुनावण्या सुरू आहेत. न्यायालयात भक्कम पुरावे आणि साक्षी सादर करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.१५ कोटींची फसवणूकएकूण ३७ गुन्ह्यांमध्ये १५ कोटींची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षात ही फसवणूक सुमारे दीडशे कोटींवर आहे. अनेक गुंतवणूकदार तक्रारी देण्यासाठी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या फसवणुकीची रक्कम पोलिसांच्या रेकॉर्डवर येत नाही.या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखलआरोपपत्र दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मेकर ॲग्रो, सान्विक ट्रेडिंग, ई-स्टोअर, वेल्थ शेअर या प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे. गरजेनुसार पुरवणी आरोपपत्रही दाखल केली जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • एकूण गुन्हे - ३७
  • संशयित आरोपी - दीडशेहून जास्त
  • फसवणुकीची रक्कम - १५ कोटी
  • अटक आरोपी - २४
  • दोषारोप दाखल गुन्हे - ११
  • दोषारोप दाखल आरोपी - २३

पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार प्रलंबित आर्थिक गुन्ह्यांचा प्राधान्याने तपास केला जात आहे. यातून काही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात यश आले. लवकरच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल. - संतोष डोके, पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस