शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किणे येथील चंद्रकांत शेंदरकर यांची अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्रात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 21:30 IST

गिरणी कामगाराच्या मुलाने जिद्दीने मिळविले यश

सदाशिव मोरे, आजरा : किणे ( ता.आजरा ) येथील चंद्रकांत विष्णू शेंदरकर यांची अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्राच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. सॅटॅलाइट मधून ढगांची निरीक्षण हा त्यांचा प्रकल्प आहे. गिरणी कामगाराच्या मुलाने जिद्दीने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे.

चंद्रकांतमध्ये लहानपणापासूनच जिद्द व संशोधनात्मक काम करण्याची इच्छा होती. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दादर येथील साने गुरुजी विद्यालयात, अकरावी व बारावीपर्यंत शाबूसिद्धी कॉलेज भायखळा - मुंबई येथे झाले. वडील गिरणी कामगार असल्याने यादरम्यान ते किरणे या आपल्या गावी आले. त्यानंतर बीएससीचे शिक्षण आजरा महाविद्यालय आजरा तर एमएससीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठात मॅथॅमिटीक्स या विषयातून झाले. सीडॅकचे शिक्षण गोव्यात घेतले.

शिक्षण घेत असतानाच त्यांची अमेरिकेत प्रसिद्ध असलेल्या जे.पी. मॉर्गन या बँकेत हैदराबाद येथे अधिकारीपदी निवड झाली. नोकरी करीत असतानाच एमआयटीमधून अमेरिकेतील हावर्ड युनिव्हर्सिटीमधून नासाशी संबंधीत  संशोधनाचा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांची नासा या संशोधन केंद्राच्या प्रकल्पामध्ये निवड झाली आहे. सॅटेलाईटमधून ढगांचे निरीक्षण व वेगवेगळे संशोधन या प्रकल्पामधून केले जाणार आहे.

वडील गिरणी कामगार तर आई गृहिणी असतानाही चंद्रकांतने मिळविलेले यश आकाशाला गवसणी घालणारे आहे. आजरा तालुक्यातून नासा या संशोधन केंद्रामध्ये निवड झालेला चंद्रकांत हा पहिला विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :NASAनासाkolhapurकोल्हापूर