Chandrakant Patil was born to go to the Himalayas - Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांचा जन्म हिमायलयात जाण्यासाठीच - हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटील यांचा जन्म हिमायलयात जाण्यासाठीच - हसन मुश्रीफ

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचा जन्म हिमायलयात जाण्यासाठीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली टीका

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे, तर हिमालयात जाण्यासाठी झाल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाजपचे नेते सडकून टीका करीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी, उद्धव ठाकरे यांचा जन्म राज्यकारभार चालविण्यासाठी नव्हे तर संघटना चालविण्यासाठी झाल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पाटील यांनी आपण कोल्हापुरातून कोणत्याही जागेवरून निवडून येऊ शकतो. तसे झाले नाही तर आपण हिमालयात जाऊ, असे वक्तव्य केले होते. पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नसून हिमालयात जाण्यासाठीच आहे.

Web Title: Chandrakant Patil was born to go to the Himalayas - Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.