भादोले येथे कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:07+5:302021-06-01T04:19:07+5:30

काळात सेवाधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी सर्व घटकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत ...

Chandrakant Patil visits Kovid Center at Bhadole | भादोले येथे कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांची भेट

भादोले येथे कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांची भेट

काळात सेवाधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी सर्व

घटकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भादोले येथे सुरू झालेल्या कोविड केअर

सेंटर व अलगीकरण केंद्रास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन भेटीवेळी दिले.

चंद्रकातदादा पाटील सोशल फाउंडेशन, भाजप किसान मोर्चा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भादोले येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या सेंटरला भेट देऊन मार्गदर्शन केले.

या वेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला व त्यांना साडी वाटप केले. या वेळी स्वामी सेवानंद महाराज, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव माने,

सरचिटणीस विठ्ठल पाटील, तालुकाध्यक्ष राजेश पाटील, सरपंच आनंदराव कोळी,

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नाना जाधव, ग्रा.पं.सदस्य विक्रम

माने, अलका पाटील, शहाजी घोलप, सुरेश पाटील, संतोष पाटील, जिनेन्द्र देसाई, भूपाल कांबळे, अर्जुन जामदार,हेमंत पाटील, सचिन नांगरे, सुहास

राजमाने, जगन्नाथ माने ग्रामसेवक शामसुंदर मुसळे, तलाठी तुषार भोसले आदी उपस्थित होते.

फोटो- ३१ भादोले

भादोले येथे आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस

यांना साडी वाटप करताना चंद्रकांत पाटील, स्वामी सेवानंद महाराज, नाना जाधव, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Chandrakant Patil visits Kovid Center at Bhadole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.