शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Chandrakant Patil: 'पोचलो रे हिमालयात'... आव्हाड अन् मिटकरींनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 14:53 IST

उत्तर कोल्हापूर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली होती.

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी हे यश मिळवलं असून त्यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. 

उत्तर कोल्हापूर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह बड्या नेत्यांची फौज भाजपनं कामाला लावली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरात ठाण मांडून होते. मात्र तरीही भाजपला विजय मिळवता आला नाही. त्यामुळेच, चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये, ते हिमालयात बसल्याचे दिसून येतात. या फोटोसह आव्हाड यांनी, दादा परत या... असे कॅप्शन दिलं आहे. तसेच, हा फुले-शाहू-आंबडेकर विचारांचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं.  राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करत खिल्ली उडवली. ''हनुमान जयंतीच्या पवित्र दिनी कोल्हापूरमधील पराभवानंतर चंद्रकांत दादांना राजकारण सोडून हिमालयात जावे लागणार हे पाहून फार दुःख झाले. दादा तुम्ही अशी वल्गना करायला नको होती, तुमच्यामुळे राजकारणात रोज मनोरंजन होत असे'', असे ट्विट मिटकरी यांनी केलं आहे.    व्हायरल व्हिडिओत काय म्हणाले चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. मात्र असं असूनही जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात होत असते. त्यावर बोलताना पाटील यांनी थेट आव्हान दिलं होतं. 'आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची.. निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असं पाटील म्हणाले होते. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांतदादा म्हणतात...

चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. उत्तर कोल्हापूरात आम्ही काय करणार आहोत ते आम्ही सांगितलं होतं. पूर येऊ नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी भाजप काय करेल ते आम्ही जाहीर केलं होतं. पण मतदारांनी आम्हाला कौल दिला नाही. मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे, असं पाटील म्हणाले. भाजपचा पराभव झाला तर हिमालयात जाणार असं तुम्ही म्हणाला होतात, याची आठवण पत्रकारांनी त्यांना करून दिली. त्यावर मी काय करायचं ते मी आणि माझं श्रेष्ठी ठरवतील, असं पाटील यांनी सांगितलं. 

मी निवडणूक लढलो नाही

मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं म्हटलं होतं. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही असं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जाते. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभं करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा