शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांना मस्ती आली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

कागल : चंद्रकांत पाटील हे कोणावरही धमकीच्या आणि तंबीच्या भाषेत टीका करीत आहेत. छगन भुजबळ जामिनावर सुटलेले आहात, ...

कागल :

चंद्रकांत पाटील हे कोणावरही धमकीच्या आणि तंबीच्या भाषेत टीका करीत आहेत. छगन भुजबळ जामिनावर सुटलेले आहात, अशी भाषा बोलले होते. अशोक चव्हाणांची औकात काढली. आता अजित पवारांवर बोलत आहेत. त्यांच्यावर एक व्यंगचित्र छापून आले आहेत. झोपेत पलंगावरून खाली पडले तरी सरकार पडले, सरकार पडले, असे ते ओरडत आहेत. एकूणच त्यांना मस्ती आली आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. कागल येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी नेहरू आणि गांधी या पंतप्रधानांची कारकीर्द आतापेक्षा चांगली होती, असे म्हटल्याने, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम लोकांना पसंद पडल्याचे दाखविले गेल्याने चंद्रकांतदादांचा तोल सुटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याशी संबंधित साहित्य खरेदीवर जीएसटी माफ करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांचे सर्व अर्थमंत्री सदस्य असणारी एक समिती नेमली. मात्र, त्याचे अध्यक्षपद मेघालयसारख्या छोट्या राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे दिले. वास्तविक ते अजितदादांना द्यायला हवे होते. कारण जीएसटी सर्वाधिक देणारे महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात कोरोनाचेही संकट मोठे आहे.

चौकट

● केंदांकडून महाराष्ट्राचे खच्चीकरण

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, पंतप्रधान मोदींप्रमाणे निर्मला सीतारामनही महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. पंतप्रधानांनी चक्रीवादळाबद्दल गुजरातला एक हजार कोटींची नुकसानभरपाई जाहीर केली. पश्चिम बंगाल, ओडिशालाही नुकसानभरपाई जाहीर केली, पण महाराष्ट्राला यातून वगळले. संधी मिळेल तिथे ही मंडळी महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत.

● खाकीतील दरोडेखोर..

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करणारा गजेंद्र पाटील म्हणजे दुसरा परमबीर सिंगच आहे. केवळ आरोपामुळे अनिल देशमुख यांच्यासारख्या चांगल्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. खाकीतील हे दरोडेखोर हजारो कोटींची उलाढाल करतात. हे आधी गजाआड झाले पाहिजेत. ते लवकरच होतील, असा सूचक इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला.