शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर दावा दाखल करावाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंभर कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. आपले त्यांना सांगणे आहे, त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकातील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करावे, या प्रकणात जे आरोप आहेत, त्यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची चौकशीच कशी होऊ शकते? राज्य सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू असल्याचे आपण म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी दाव्याची धमकी दिली आहे, त्यांनी दावा दाखल करावाच, दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊदे. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीतील आराेपाबाबत आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर शंभर काेटींचा दावा दाखल केला आहे, तो जिल्हा सत्र न्यायालयात सुरु असल्याची आठवणही मंत्री मुश्रीफ यांनी करून दिली.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ‘एसआयटी’ने तपास पूर्ण करत आणला असताना तो ‘एनआयए’कडे दिला. आताही स्फोटकांच्या तपासाचा मुंबई पोलिसांनी छडा लावला हाेता, त्यातील नावे बाहेर येणार होती, तोपर्यंत हाही तपास ‘एनआयए’कडे दिला. या देशात चालले तरी काय? तपास देऊन काय? हाती लागले, सुशांतसिंग व वाझे प्रकरणात एनआयए पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतींना चिंता

देशात कोरोनाचे संकट भयावह झाले आहे. अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे येत आहेत तरीही या मंडळींना राजकारण सुचते. केंद्र सरकार गेले सहा महिने काय करत हाेते? असा प्रश्न खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीनीच केला आहे. आता एकमेकांवर टीका करत बसण्याची ही वेळ नाही. राज्य सरकार लस व रेमडेसिविर खरेदीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

कायदा बदलण्यापेक्षा साखरेची दरवाढच योग्य

एफआरपीचा कायदा बदलणे कठीण आहे. त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करून तो प्रतिक्विंटल ३,४०० रूपये करणे अधिक उचित ठरेल. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारणीबाबत २ मेनंतर बैठक घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.