शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चंद्रकांतदादा, सत्तेच्या मस्तीत राहिलात हेच चुकलं : मुश्रीफ यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:14 PM

मंत्रिमंडळात दोन नंबरचे खाते असतानाही गेल्या पाच वर्षांत नजरेत भरण्यासारखे एकही काम केले नाही. घराकडे भेटायला येणाऱ्यांचा अपमान केला. अपॉइंटमेंटशिवाय कोणाला भेट दिली नाही. कोल्हापूरच्या जनतेचे प्रेम, विश्वास संपादू शकला नाहीत, कायम सत्तेच्या मस्तीत राहिलात, हेच तुमचे चुकले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. पालकमंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘आमचं काय चुकलं?’अशी विचारणा जनतेला केली होती.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा, सत्तेच्या मस्तीत राहिलात हेच चुकलं : मुश्रीफ यांचा टोलाकोल्हापूरकरांचे प्रेम तुम्हांला जिंकता न आल्यानेच दारुण पराभव

कोल्हापूर : मंत्रिमंडळात दोन नंबरचे खाते असतानाही गेल्या पाच वर्षांत नजरेत भरण्यासारखे एकही काम केले नाही. घराकडे भेटायला येणाऱ्यांचा अपमान केला. अपॉइंटमेंटशिवाय कोणाला भेट दिली नाही. कोल्हापूरच्या जनतेचे प्रेम, विश्वास संपादू शकला नाहीत, कायम सत्तेच्या मस्तीत राहिलात, हेच तुमचे चुकले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. पालकमंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘आमचं काय चुकलं?’अशी विचारणा जनतेला केली होती.तुम्ही आस्थेवाईकपणे जनतेची चौकशी केली असती, समस्या सोडवल्या असत्या तर लोकांनी डोक्यावर घेतले असते, चळवळी, आंदोलने दडपण्यासाठीच ताकद वापरली. कायम पोलिसांचा गराडाच सोबत घेऊन फिरलात. जनता आणि कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला नाहीत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आमदार म्हणून निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार समारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोलताना जनतेच्या वतीने काँग्रेस आघाडीचे नेते आमदार मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार प्रश्नाला उत्तर देताना जनतेला गृहीत धरले तर काय होते, याचा चांगला धडा भाजपला मिळाला असल्याचे सांगून सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवली आहे. आता तरी वागण्याबोलण्यात सुधारणा करा, असा सल्लाच दिला. सत्तेची सूजही उतरली आहे. येथून पुढेच ते राजकारणात सौहार्दाचे वातावरण ठेवतील, जनतेचे प्रेम जिंकतील असा विश्वासही व्यक्त केला.टोलचे श्रेय मंडलिक, पानसरे, एन.डी. यांचेएलबीटी आमच्या काळात स्थगित झाला होता. टोल रद्दचे संपूर्ण श्रेय गोविंद पानसरे, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचे आहे. ते आम्ही रद्द केले, असा टेंभा पालकमंत्री पाटील यांनी मिरवू नये, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.-द्वेषामुळेच शरद पवार व अजित पवार यांच्यामागे ईडीचा ससेमिरापालकमंत्र्यांनी व्यक्तिश: मला खूप त्रास दिला, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेचा कलम ८८ चा निकाल उलटा द्यायला लावला. उच्च न्यायालयातून आम्ही स्थगिती आणल्यावर मला अध्यक्षपदावरून बाजूला करण्यासाठी १० वर्षांचा अध्यादेश आणला. त्यालाही आम्ही स्थगिती मिळविल्यावर पालकमंत्र्यांनी राज्य बँकेवर कलम ८८ अंतर्गत कारवाई सुरू केली.

माझ्यामुळेच अजित पवार यांच्यावर कलम ८८ नुसार कारवाई सुरू झाली. त्यालाही अडीच वर्षांची स्थगिती आल्यावर ईडीकडे आमची तक्रार केली. फक्त माझ्याबद्दल असलेल्या द्वेषामुळे ईडीने एफआयआर दाखल केला. माझ्यामुळे शरद पवार यांनाही यात गोवले गेले. आयकरचा छापाही टाकला. एवढा त्रास आजवर कुणी दिला नाही. मतभेद असू शकतात, पण ते प्रेमाने संपवायचे असतात; पण पालकमंत्र्यांनी द्वेषाने हे सर्व केले, त्याची शिक्षा त्यांना जनतेनेच दिली आहे.’ 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर