शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना गोव्यात लुटले, मारहाण करत नग्न व्हिडीओ बनवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:56 IST

अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत तरुणांनी आपले गाव गाठले. पण या प्रकारामुळे सर्वच तरुण गेले दोन दिवस तणावाखाली होते

चंदगड : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील अकरा तरुणांना चार ते पाच अज्ञातांनी बेदम मारहाण करत लुटले. तर, त्यांच्याकडून पैसे व मोबाईल काढून घेऊन त्यांचा नग्न व्हिडिओ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.२६) गोव्यात घडली. याबाबत पीडित तरुण म्हापसा पोलिसात तक्रार करणार आहेत. तर, आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी चंदगड पोलिसांकडे निवेदनातून पीडितांनी केली.याबाबत माहिती अशी की, चंदगड तालुक्यातील अकरा तरुण गोव्याला फिरायला गेले होते. गुरुवारी ते गावी परत येत असताना गोव्यातील अज्ञातांनी त्यांना बोंडगेश्वर मंदिराशेजारी अडविले व आमच्याकडे जेवण चांगले मिळते असे सांगत गाडी एका निर्जनस्थळी नेली. त्यानंतर गाडीतील सर्वांना एका हाँटेलच्या खोलीमध्ये कोंडले. त्यांच्याकडून पैसे, मोबाईल, अंगठी व चेनही काढून घेतले. इतकेच नाही तर, तरुणांना नातेवाईकांकडून ऑनलाईन पैसे मागवून द्या, नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे भयभयीत झालेल्या तरुणांनी पैसे मागवून त्यांना दिले.त्यानंतर अज्ञातांनी आपल्या आणखीन तीन ते चार साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतरही बेदम मारहाण करत पीडित तरुणांचा नग्न व्हिडीओही तयार करुन याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास तुमचे नग्न व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणार व तुम्हाला जिवंतही सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यानंतर अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत तरुणांनी आपले गाव गाठले.सर्वच तरुण दोन दिवस तणावाखालीघडलेल्या या प्रकारामुळे सर्वच तरुण गेले दोन दिवस तणावाखाली होते. त्यामुळे याबाबत त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र पीडित तरुणांनी आज, शनिवारी झालेल्या प्रकाराला वाचा फोडली. सामाजिक कार्यकर्ते अँड. संतोष मळविकर यांच्या कानावर घडलेला प्रकार घातला. त्यानंतर पिडीतांना धीर देत पोलीस संरक्षणासाठी चंदगड पोलिसांना निवेदन दिले. निवेदनावर अँड. संतोष मळविकर, समीर शिंदे, सतीश आपटेकर, सुभाष गावडे, सुभाष गावडे, प्रविण पाटील, मनोज शिंदे, अभिषेक पाटील, निखिल गावडे, नितीन गावडे, रोहित गावडे, सागर हसूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.अज्ञातांविरोधात आज तक्रार करणारचंदगड तालुक्यातील तरूणांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी उद्या, रविवार (दि. २९) रोजी म्हापसा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती अँड. मळविकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgoaगोवाtourismपर्यटनCrime Newsगुन्हेगारी