कोल्हापूर : पावसाची सोमवारपासून काहीशी उघडीप जाणवत असली तरी मान्सून वारे सक्रिय झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात उद्या, शनिवार दि. १३ सप्टेंबरपासून गुरुवार दि. १८ सप्टेंबर या आठवड्यात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान ३.१ किलोमीटर उंचीपर्यंतच्या चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि मान्सून आसाचे पश्चिम टोक दक्षिणेकडे गुजरातपर्यंत सरकल्यामुळे त्याच्या परिणामातून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेतून मान्सून वारे सक्रिय झाले आहे. त्यामुळे शनिवार, दि. १३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मात्र अजूनही पुढील सहा दिवस सोमवार, दि. १५ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील धरणसाठा..धरण साठा टीएमसीत, कंसात पाऊस (मिलीमीटर) -
- राधानगरी - ८.०९ (०),
- तुळशी - ३.४७ ( ०),
- वारणा - ३३.७४ (०),
- दूधगंगा - २१.२९ (०),
- कासारी - २.६४ (०),
- कडवी - २.५२(०),
- कुंभी - २.६५ (१०),
- पाटगाव - ३.६७ (०)