शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पूरबुडीत उसाचे कारखान्यास आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

घनशाम कुंभार यड्राव: नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात पूर्णपणे बुडालेल्या उसाला फुटवे फुटल्याने त्याचे गाळप करणे साखर कारखान्यास फायद्याचे ठरत ...

घनशाम कुंभार

यड्राव: नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात पूर्णपणे बुडालेल्या उसाला फुटवे फुटल्याने त्याचे गाळप करणे साखर कारखान्यास फायद्याचे ठरत नसले तरी ज्या ऊस उत्पादकांनी साखर कारखान्याकडे उसाच्या नोंदी दिल्या आहेत. तो ऊस गाळपास आणणे कारखान्याची जबाबदारी असते. पूर्ण पूरबुडीत उसाच्या गाळपाचे नियोजन करून त्याचे गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामध्ये शिरोळ तालुक्यातील १७ हजार हेक्टर ऊस पिकास फटका बसला आहे. यातील २० टक्के म्हणजे ३४०० हेक्टर ऊस पूर्णपणे बुडाला असून उभ्या ऊस पिकाचा सर्व पाला खराब होतो. उसाच्या पाल्यामध्ये सत्व नसल्याने त्याची वाढ होत नाही. तर उसाच्या डोळ्यांना कोंब फुटले आहेत. त्या नवीन कोंबाना वाढ होण्यास त्या उसातील जीवनसत्त्वे मिळत असल्याने त्या उसाच्या वजनाबरोबर साखरेचे प्रमाणही घटते याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना सहन करावा लागतो.ज्या ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना ऊस क्षेत्राची नोंद केली असेल त्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेणे कारखान्यास बंधनकारक आहे. पण ज्यांनी ऊस कोणत्याही कारखान्यास नोंद केला नाही अशा शेतकऱ्यांच्या पुढे उसाचे काय करायचे हा प्रश्न उभा आहे.

मागील वर्षीच्या जून ते ऑक्टोबरपासून लावलेल्या नोंदीचा पंधरापेक्षा जादा कांड्या असलेला ऊस कारखान्यास पाठविण्यास शेतकरी प्रयत्नशील राहतो. तर जानेवारी ते मार्चपर्यंत लागण केलेल्या पंधरापेक्षा कमी कांड्याचा पूरबुडीत ऊस शेतातून काढून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही.

प्रत्येक साखर कारखाना चांगली रिकव्हरी येण्यासाठी परिपूर्ण वाढ झालेला ८६०३२, १०००१ व यासारख्या विशिष्ट जातींच्या दर्जेदार उसाचे गाळप करतो. यामुळे पुढील हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर देता येतो, याकरिता ते प्रयत्नशील असतात. म्हणून आपापल्या कारखान्याकडे नोंद असलेला पूरबुडीत ऊस गाळपास आणल्यास रिकव्हरीमध्ये फरक पडू शकतो व त्याचा तोटा सहन करावा लागतो. यासाठी पूरबुडीत ऊस गाळपाचे नियोजन करणे साखर कारखान्यांपुढे आव्हान आहे.

------------------------

कोट -

शेतकऱ्याने ऊस लावून सोळा ते वीस महिने उसाचे जतन केले असते. त्यातच आलेल्या नैसर्गिक महापूर संकटामुळे ऊस बाधित होतो. ज्या कारखान्यांना ऊस नोंद दिला आहे तो सर्व ऊस कारखान्यांना घ्यावाच लागेल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.

- सागर संभूशेटे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना

फोटो - २१०९२०२१-जेएवाय-०२, ०३

फोटो ओळ - ०२) पूरबुडीत उसाचा पाला खराब झाल्याने उसाच्या डोळ्यांना कोंब फुटत आहेत. यामुळे उसाचे क्षेत्र वाळल्यासारखे दिसते.

०३) पूर्ण पूरबुडीत उसाच्या डोळ्यांना कोंब फुटले आहेत.