पेठवडगाव : येथे ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ते आरक्षण पूर्ववत करावे या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन फिजिकल डिस्टन्सिंग राखून करण्यात आले. हे आंदोलन भाजपच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भाजपचे अध्यक्ष जगन्नाथ माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुधाकर पिसे यांनी ओबीसी आरक्षणावर वस्तुस्थिती मांडली. यावेळी मनोहर काटकर, विजय शहा, बंडा गोंदकर, सुरेश पाटील, सुनील लाड, सलीम बागवान, शिवाजी नाईकवाडे, बाळू खरात, हरी झगडे, उमा ठिगळे, सुनील सलगर, युवराज वाळवेकर, राजू वायदंडे, आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
पेठवडगाव : येथील पालिका चौकात भाजपच्या ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी डाॅ. अशोक चौगुले, जगन्नाथ माने, सुधाकर पिसे, धनंजय गोंदकर, सुनील लाड, आदी सहभागी झाले होते.