Jotiba Chaitra Yatra 2026: महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, सोमवारपासून सुरू हाेत आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र, त्याआधीच जोतिबा डोंगर भाविकांनी फुलला असून, मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावरदेखील यात्रेकरूंसाठी सोयीसुविधा उभारण्यात येत आहे.जोतिबा देवाची वर्षातील सर्वांत मोठी यात्रा चैत्र पौर्णिमेला होत असून, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे श्रींचा अभिषेक आरती करून सालंकृत पूजा बांधली जाईल. दुपारी १ वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजनाने सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल.दुपारी ४ वाजता जोतिबा देवीच्या पालखी साेहळ्याला सुरुवात होईल. त्यानंतर यमाई मंदिर येथे विवाह सोहळा होईल. रात्री उशिरा पालखी मंदिरात येईल. यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची तयारी पूर्ण झाली असून, दुसरीकडे भाविकदेखील मोठ्या संख्येने डोंगरावर येत आहेत. यात्रेआधीच डोंगर खोबरं, गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघाला आहे.
बेळगावची उत्सवमूर्ती, सासनकाठी दाखलपोर्ले तर्फ ठाणे : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर भाविक दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.जोतिबा चैत्र यात्रेसाठी बेळगावची सासनकाठी जोतिबा उत्सवमूर्तीसह मंदिरात दाखल झाली शिवाय अन्य मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत. जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेची धामधूम सुरू झाल्याने,अवघा जोतिबा डोंगर भावभक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र आहे.रविवारी (दि.२९) दुपारी बारा वाजता कर्नाटकातील बेळगाव येथील जोतिबा उत्सवमूर्ती जोतिबा डोंगरावर दाखल झाली. साधारणता १२७ किलोमीटर आंतर चालत जोतिबा डोंगर येथे दरवर्षीप्रमाणे बेळगावची जोतिबा उत्सवमूर्ती परंपरेने वाद्यासह आली. तीन दिवस जोतिबा डोंगरावर त्यांचे वास्तव असते. बेळगावहून चार दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली जोतिबा उत्सवमूर्ती रविवारी दुपारी बारा १२ वाजता जोतिबा डोंगरावर दाखल झाली
सहजसेवाचे अन्नछत्र आजपासून सुरूलाखो भाविकांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’तर्फे सलग २६व्या वर्षी गायमुख परिसरात भव्य अन्नछत्र उभारले असून, आज सोमवारपासून हे अन्नछत्र सुरू होत आहे. त्यासाठी १५ हजार चौरस फुटाचा भव्य मंडप उभारला असून, चहा व मठ्ठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. बैलांसाठी शेंगदाणा पेंड व भुस्सा असेल. दिला जातो. कर्तव्यावर असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना, सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनाही ट्रस्टतर्फे जेवणाची पाकिटे पोहोचवली जाणार आहेत. या कार्यासाठी ४०० स्वयंसेवक अहोरात्र सेवेत असतील.
व्हाइट आर्मी रुग्णालयाची आजपासून चार दिवस सेवायात्रेकरूंसाठी व्हाइट आर्मीच्या जीवनमुक्ती संस्थेचे अत्याधुनिक रुग्णसेवा सुविधांनी सज्ज वातानुकूलित रुग्णालय उभारण्यात आले आहे. ही वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत असून, ३० मार्च ते २ एप्रिल या चार दिवसात सुरू राहील. रुग्णालयात सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून औषधांचे मोफत वितरण केले जाईल. डॉक्टरांचे सेवा पथक रोज ३ शिफ्टमध्ये २४ तास सलग सेवा देईल. आपत्कालीन रेस्क्यू टीम, हृदय रुग्णांसाठी हार्ट ब्रिगेड व ॲम्ब्युलन्स, हरवलेल्यांचे शोध केंद्र, विश्रांती व हिरकणी कक्ष असेल.
मोफत दुचाकी-चारचाकी दुरुस्तीकोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या पंक्चर झाल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास त्यांना तत्काळ मोफत सेवा दिली जाणार आहे. यासाठी कोल्हापूर शहरासह गायमुख पार्किंग आणि गिरोली घाट येथे स्वतंत्र पथके तैनात असतील. तसेच दुचाकींसाठी फिरते पेट्रोलिंग पथकही कार्यरत असेल. कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वर्कशॉप ओनर वेल्फेअर असोसिएशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे नादुरुस्त चारचाकी वाहनांची यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत एमटीडीसी कॉर्नर, गिरोली फाटा येथे यमाई मंदिरामागे, आंब्याच्या झाडाजवळ वाहनतळ, गायमुखाजवळ येथे सेवा दिली जाईल.
कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनातयात्रेसाठी सुमारे तीन हजार पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एक अपर पोलिस अधीक्षक, आठ उपअधीक्षक, ४० पोलिस निरीक्षक, ७० सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, १२०० पोलिस, एक हजार होमगार्ड तर ८०० वाहतूक पोलिस हे सर्व जण यात्रेवर नियंत्रण करणार आहेत.
Web Summary : Kolhapur's Jotiba Yatra commences with devotees flocking to the hill. The main day is Wednesday, featuring processions and rituals. Free food, medical services, and vehicle repair are available. Heavy police security ensures a safe pilgrimage for the lakhs of devotees expected.
Web Summary : कोल्हापुर में जोतिबा यात्रा शुरू, भक्त पहाड़ी पर उमड़ रहे हैं। बुधवार को मुख्य दिन है, जिसमें जुलूस और अनुष्ठान होंगे। मुफ्त भोजन, चिकित्सा सेवाएं और वाहन मरम्मत उपलब्ध हैं। भारी पुलिस सुरक्षा लाखों भक्तों के लिए सुरक्षित तीर्थयात्रा सुनिश्चित करती है।