शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 7:15 PM

Education Sector kolhapur- कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन व वडगावचे माजी नगरसेवक  रंगराव दत्तू उर्फ आर. डी. पाटील (वडगावकर) (वय ७६) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,  सुना, नातवंडे असा परिवार आहे.       

ठळक मुद्देप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील यांचे निधनवडगावचे माजी नगरसेवक, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपद भूषवले

पेठवडगाव: कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन व वडगावचे माजी नगरसेवक  रंगराव दत्तू उर्फ आर. डी. पाटील (वडगावकर) (वय ७६) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,  सुना, नातवंडे असा परिवार आहे.        पेठवडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.यामध्ये माजी खासदार जयवंतराव आवळे,आमदार राजू आवळे,आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोक माने,माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ,नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या प्रामुख्याने समावेश होता.आर. डी. पाटील (वडगावकर) हे मूळचे भादोले गावचे होते.  पेठवडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी तीस वर्ष प्राचार्य म्हणून काम केले. १९९१ ,१९९६ (स्वीकृत),२००६ या काळात  वडगावचे  नगरसेवक होते. तर १९९७ ते २००३ या कालावधीत त्यांनी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपद भूषवले.तर राज्य मुख्याध्यापक संघाचे संचालक ही होते.   १ नोव्हेंबर २०१९ पासून ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेचे चेअरमन होते. दुपारी आर. डी. पाटील (वडगावकर) यांचे पार्थिव शाहू संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते.त्यानंतर पेठवडगाव येथील घरी नेण्यात आले.त्यांची शहरातील प्रमुख मार्गावरून किणी रोडवरील स्मशानभूमीत अत्यंसंस्कारासाठी नेण्यात आले.शनिवारी रक्षाविसर्जन आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर