पेठवडगाव: कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन व वडगावचे माजी नगरसेवक रंगराव दत्तू उर्फ आर. डी. पाटील (वडगावकर) (वय ७६) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पेठवडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.यामध्ये माजी खासदार जयवंतराव आवळे,आमदार राजू आवळे,आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोक माने,माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ,नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या प्रामुख्याने समावेश होता.आर. डी. पाटील (वडगावकर) हे मूळचे भादोले गावचे होते. पेठवडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी तीस वर्ष प्राचार्य म्हणून काम केले. १९९१ ,१९९६ (स्वीकृत),२००६ या काळात वडगावचे नगरसेवक होते. तर १९९७ ते २००३ या कालावधीत त्यांनी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपद भूषवले.तर राज्य मुख्याध्यापक संघाचे संचालक ही होते. १ नोव्हेंबर २०१९ पासून ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेचे चेअरमन होते. दुपारी आर. डी. पाटील (वडगावकर) यांचे पार्थिव शाहू संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते.त्यानंतर पेठवडगाव येथील घरी नेण्यात आले.त्यांची शहरातील प्रमुख मार्गावरून किणी रोडवरील स्मशानभूमीत अत्यंसंस्कारासाठी नेण्यात आले.शनिवारी रक्षाविसर्जन आहे.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 19:16 IST
Education Sector kolhapur- कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन व वडगावचे माजी नगरसेवक रंगराव दत्तू उर्फ आर. डी. पाटील (वडगावकर) (वय ७६) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील यांचे निधन
ठळक मुद्देप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील यांचे निधनवडगावचे माजी नगरसेवक, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपद भूषवले