शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा वृध्देची चेन लंपास, चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 21:43 IST

गजबजलेल्या महाद्वाररोडवरील वांगी बोळ येथे घरासमोर उभ्या असलेल्या वृध्देच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरट्याने हिसडा मारुन लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा दोनच्या सुमारास ही घटना घडल्याने जुनाराजवाडा पोलीसांची तारांबळ उडाली.

 कोल्हापूर - गजबजलेल्या महाद्वाररोडवरील वांगी बोळ येथे घरासमोर उभ्या असलेल्या वृध्देच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरट्याने हिसडा मारुन लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा दोनच्या सुमारास ही घटना घडल्याने जुनाराजवाडा पोलीसांची तारांबळ उडाली. सर्वत्र नाकाबंदी करुन चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. चोरटा येथील एका घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला असून पाळत ठेवून त्याने चेन स्नॅचिंग केल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले. 

अधिक माहिती अशी, दिपाली दिलीप गुळवणी (वय ६१) यांचे ए वॉर्ड वांगी बोळ येथे घर आहे. शुक्रवारी दूपारी दोनच्या सुमारास त्या घरासमोर उभ्या होत्या. समोर राहत असलेल्या महिलेला पाणी आलेय का म्हणून त्या विचारपुस करीत होत्या. यावेळी अचानक पांढºया रंगाच्या मोपेडवरुन आलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील चेन हिसडा मारुन पोबारा केला. गुळवणी यांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. तो पर्यंत चोरटा पसार झाला होता. भयभित झालेल्या गुळवणी यांना लोकांनी सावरले. त्यानंतर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलीस निरीक्षक गुजर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. येथील राठोड यांच्या घराच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचे फुटेज पाहिले असता तीस वर्षाचा तरुण वांगी बोळ येथे चालत फिरत असताना दिसून आला. तो आजूबाजूच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिलांना लक्ष करीत असल्याचे दिसून आले. गल्लीमध्ये लोकांची वर्दळ कमी होताच बाजूला लावलेली मोपेड घेवून त्याने चेन हिसडा मारुन घेतली. त्यानंतर तो महाद्वाररोडवरुन खरी कॉर्नरच्या दिशेने पसार झाला. तो सुरुवातीस निवृत्ती चोकातून वांगी बोळ येथे आलेचे फुटेज पोलीसांना मिळाले आहे. त्याच चेहरा स्पष्ट कसून अंगामध्ये निळा-पांढºया रंगाचा टी शर्ट व जिन्सची पॅन्ट घातली आहे. टेहाळणी करुन त्याने चेन स्नॅचिंग केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. भरदिवसा चेन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याने नागरिकांत भिती पसरली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाnewsबातम्या