शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची सेवा सुरळीत; महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:19 IST

एसटी, खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूकही सुरू

कोल्हापूर : मुंबईसह महाराष्ट्रभरात तुफान पाऊस सुरू आहे. दरम्यान, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक रविवारी ४५ मिनिटे ठप्प झाली होती. मात्र कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेत पोहाेचल्याने ही सेवा सुरळीत असल्याची माहिती स्थानकप्रमुखांनी दिली. सोमवारी रात्री ही गाडी मुंबईकडे वेळेतच मार्गस्थ झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईकडे धावणाऱ्या सर्व गाड्यांची सेवाही सुरळीत असून, खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूकही सुरू आहे.पावसामुळे रविवारी वडाळा ते सीएसएमटी स्थानकावर ८ इंचापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे रेल्वेची वाहतूक ४५ मिनिटांसाठी बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवासी स्थानकावर ताटकळले. महालक्ष्मी एक्स्प्रेसही बदलापूरजवळ काही काळ थांबवण्यात आली होती, मात्र त्यानंतर ही वाहतूक सुरू झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी सकाळी ही गाडी नियोजित वेळेत कोल्हापुरात पोहोचली. सोमवारी रात्री कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेत सुटली. मार्गावर कुठेही पाणी आले नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईसह इतर जिल्ह्यांकडे धावणाऱ्या एसटी बसेसही वेळेत धावत असल्याची माहिती विभागीय आगाराकडून देण्यात आली. राज्यात कोठेही पावसामुळे वाहतूक ठप्प झाली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. खासगी ट्रॅव्हल्सही सुरळीत सुरू असल्याचे ट्रॅव्हल्स चालक संघटनेने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसrailwayरेल्वेMumbaiमुंबई