शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

केंद्रीय आरोग्य समितीमूळे अर्धे शटरही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:31 IST

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या रूग्ण वाढीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य समिती आल्यामुळे अर्धे शटर उघडून सुरू असलेला व्यापारी गुरूवारी बंद करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. आज, शुक्रवारी पुन्हा दुकाने सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य समितीमूळे अर्धे शटरही बंदकोल्हापुरातील चित्र, व्यापाऱ्यांत असंतोष, दुकाने सुरू करण्यावर ठाम

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या रूग्ण वाढीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य समिती आल्यामुळे अर्धे शटर उघडून सुरू असलेला व्यापारी गुरूवारी बंद करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. आज, शुक्रवारी पुन्हा दुकाने सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत.कोरोना आजार नियंत्रणात आलेला नाही, याची कारणे विविध पातळीवर शोधून उपाय योजना केले जात आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय आरोग्य समितीचा दौरा होता. दौऱ्यामुळे शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी, महाव्दार रोड, शिवाजी रोड, सुभाष रोड आदी परिसरातील दुकानांचे अर्धे शटरही बंद करण्यात आले.सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. पण सरकारने याकडे दूर्लक्ष केले आहे. यामुळे नाईलाजास्तव दुकानदार अर्धे शटर उघडून व्यापार सुरू केला आहे. पण दिवसभर केंद्रीय आरोग्य समिती शहरात असल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना पूर्णपणे शटर बंद करण्यास भाग पाडले. शटर उघडू नये, यासाठी दिवसभर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. शहरातील दसरा चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, कसबा बावडा आदी प्रमुख रस्त्यावर पोलीस, महापालिकेचे कर्मचारी वाहनधारकांना अडवून मास्क परिधान केल्याची खात्री करत होते.

याशिवाय वाहन चालवण्याच्या परवान्याची विचारणा करीत होते. परवाना नसलेल्यांवर आणि मास्क परिधान न केलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. अर्धे शटरही बंद करण्यास भाग पाडल्याने सर्वच व्यापाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी आता दूकाने पूर्णपणे बंद करायचे नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर