शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार वाढवण्यात केंद्र सरकार अपयशी - डॉ. वंदना सोनाळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:17 IST

'ही तर अक्राळविक्राळ भांडवलशाही'

कोल्हापूर : खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सध्याच्या काळात जरी हातात पैसे जास्त आले असे वाटत असले तरी सर्वसामान्यांना जगण्यासाठी ते पुरे पडत नाहीत, हे वास्तव आहे. तसेच रोजगार वाढवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरल्याचे मत अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.अवी पानसरे व्याख्यानमालेमध्ये त्यांनी बुधवारी ‘जागतिक भांडवलशाहीची सद्य:स्थिती आणि भारताची अर्थव्यवस्था’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले होते. यावेळी गतवर्षीच्या व्याख्यानमालेतील भाषणांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ. सोनाळकर यांनी १९९१च्या आधीची परिस्थिती आणि खुल्या अर्थव्यवस्थेनंतरची स्थिती याचा आढावा घेत आपली निरीक्षणे मांडली. त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात दोन धक्के भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करून गेले. एक म्हणजे नोटाबंदी. यामुळे अनेक छोटे उत्पादक आणि व्यापारी टिकू शकले नाहीत. तर कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लॉकडाऊन केले गेले त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. त्यानंतरच्या काळातही मंद गतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढले. परंतु रोजगार निर्मितीसाठी सरकारने गुंतवणूक न केल्याने औद्योगिक रोजगार निर्मिती झाली नाही.

त्या म्हणाल्या, सध्या जी काही आकडेवारी सरकार सांगत आहे, त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न पडतो. सरकारी उद्योग, व्यवसायही खासगी होऊ लागले आहेत. खासगी विद्यापीठेही सुरू झाली. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर भांडवलशाहीने आपली मजबूत पकड ठेवली असून, त्यातून प्रसारमाध्यमेही सुटलेली नाहीत. एका बाजूला भांडवलदार आहे. त्याच्याच हातात पैसा आहे. त्याच्याच हातात तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यासमोर मिळेल त्या किमतीला आपल्या श्रमाची विक्री केल्याशिवाय तरणोपाय नाही, असा बेरोजगार आहे.सर्वसामान्यांसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ही सरकारची जबाबदारी आहे असे १९८०च्या दशकाच्या शेवटापर्यंत मानले जात होते. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. सरकारी शाळा बंद पडत आहेत, मुलींचे शिक्षण थांबत आहे. दर्जेदार आरोग्य सेवा मिळेनाशी झाली आहे. पंडित नेहरूंच्या चुका झाल्याचे तेच घिसेपिटे वाक्य सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम सुरू झाले आहे.प्रतिज्ञा कांबळे यांनी स्वागत केले. राहुल सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अशोक चौसाळकर, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, शिवाजीराव परुळेकर, डॉ. भारती पाटील, मेघा पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ही तर अक्राळविक्राळ भांडवलशाहीकार्यक्रमाचे अध्यक्ष ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले म्हणाले, सध्या देशभरात अर्थविषयक जी धोरणे राबवली जात आहेत. त्याला फक्त ‘अक्राळविक्राळ भांडवलशाही’ असेच म्हटले पाहिजे. नेहरूंच्या काळात पैसा, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ काहीच नव्हते. परंतु त्यातून त्यांनी अनेक संस्था, उद्योग उभारले. ज्यातून पुढे भारत घडत गेला. आता केवळ द्वेष पसरवणाऱ्या योजना, राजकारण, समाजकारण सुरू आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्राहून अधिक दारिद्र्य निमूर्लन झालेले असताना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात अजूनही ५२ टक्के लोक दारिद्र्यात जगतात, हे भीषण वास्तव आहे. महाराष्ट्राने तर एकूणच कारभारात उलटी दिशा पकडली असून, सगळ्या राजकारण्यांची आता मिलीभगत झाली आहे.

आजचे व्याख्यानवक्ते : संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणेविषय : प्रसारमाध्यमांची स्वायत्तता

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEconomyअर्थव्यवस्था