शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 13:55 IST

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारीच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. त्याची केंद्र सरकारने तातडीने दखल घेत केवळ २४ तासांत ही मुदतवाढ दिल्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला.देशभरात यंदा विक्रमी साखर उत्पादन झाले. येणाऱ्या गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तातडीने साखर निर्यातीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाडिक यांनी केली होती.रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या संदर्भातील चर्चेत महाडिक यांनी साखर उद्योग समोरील अडचणी मांडल्या. विशेषतः साखरेचे बंपर उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर निर्यात आणि स्थानिक बाजारातील दर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची गरज, कोरोना संकट आणि देशांतर्गत बाजारातील गरज ओळखून केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांचा फेरविचार, साखर कारखान्यांकडे दीर्घकाळ साखर पडून राहिल्यास साखरेचा दर्जा खालावण्याचा धोकाही असे मुद्दे मांडले होते.

केंद्र सरकारने ६ जूनपर्यंत साखर निर्यात करण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु पाऊस, बंदरामधील अडचणी यामुळे देशभरात ८ लाख टन साखर पडून आहे. कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. पुरवठा झाला नाही तर त्याचा भविष्यात विपरित परिणाम झाला असता. परंतू खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला केंद्र सरकारने तातडीने प्रतिसाद देऊन मुदतवाढ दिल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळाला. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक