मध्यवर्ती समितीचा लाल-पिवळ्याबाबत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:00+5:302021-01-08T05:18:00+5:30

सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हुतात्मा दिन आणि महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल ...

Central Committee warns administration of red-yellow issue | मध्यवर्ती समितीचा लाल-पिवळ्याबाबत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

मध्यवर्ती समितीचा लाल-पिवळ्याबाबत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हुतात्मा दिन आणि महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल -पिवळ्या ध्वजासंदर्भात तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या झालेल्या बैठकीत प्रामुख्याने मनपासमोर उभारण्यात आलेल्या लाल-पिवळ्या ध्वजाबाबत चर्चा झाली असून हा ध्वज त्वरित हटविण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. मनपासमोर फडकविण्यात आलेला लाल - पिवळा हा अनधिकृत असून बेकायदेशीररित्या हा ध्वज उभारण्यात आला आहे. शिवाय हा ध्वज उभारणाऱ्या तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचे घर पेटविण्यात आल्याचा खोटा आरोपही मराठी भाषिकांवर करण्यात आला आहे. मराठी भाषिकांवर होत असलेले आरोप हे धादांत खोटे असून अशा तथाकथित कार्यकर्त्यांना मराठी माणूस भीकही घालत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केली.

म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आदींसह इतर समिती नेते, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो:

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर. बैठकीत अध्यक्ष दीपक दळवी आदी.

Web Title: Central Committee warns administration of red-yellow issue