शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमधील १२ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा केंद्राचा विचार, फेरबदल झाल्यास हजारच्या आतील वस्तू होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:29 IST

मध्यमवर्गीयांना होणार लाभ

कोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणालीतील बारा टक्क्यांचा टप्पा (स्लॅब) हटविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे तसे झाल्यास मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेतही या करप्रणालीचा मोठा परिणाम होणार आहे. जीएसटी कमी झाल्यास थेट ग्राहकांना फायदा होणार आहे.सध्या ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के असे जीएसटीचे पाच स्लॅब आहेत. त्यामधील १२ टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे रद्द होऊ शकतो किंवा सध्या १२ टक्के कर आकारणाऱ्या वस्तू ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येऊ शकतात.गरीब, मध्यमवर्गीयांना लागणाऱ्या असंख्य वस्तूंचा समावेश बारा टक्क्यांच्या श्रेणीत होतो. एक हजार रुपये किमतीच्या आतील तयार कपडे, पावडर, छत्री, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, स्वयंपाकाची भांडी, इस्त्री, गिझर, कमी क्षमतेच्या वॉशिंग मशीन, सायकल, स्टेशनरी वस्तू, सिरॅमिक टाइल्स, कृषी उपकरणे, टूथपेस्ट, केसांना लावण्यात येणारे तेल ते चप्पल, लस्सी, नॅपकिन यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

होलसेल आणि रिटेल मार्केटएक हजार रुपये किमतीच्या आत असलेल्या वस्तूंचे मोठे रिटेल मार्केट कोल्हापुरात आहे. मुंबई, गुजरात, दिल्लीमधून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. पाचशेहून अधिक होलसेल व्यापारी तर पाच हजारांहून अधिक रिटेल विक्रेते आहेत. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.

जीएसटीत बदल झाल्यास कमी किमतीत वस्तू मिळतील. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होतो. मात्र, केंद्र सरकारने जीवनावश्यक असलेल्या सर्वंच वस्तूंना जीएसटीतून वगळण्याची गरज आहे. - संजय शेटे, अध्यक्ष कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स 

जीएसटीची पुर्नरचना करताना ग्राहक, उत्पादकांना विचार करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू जीएसटीतून मुक्त करण्याची गरज आहे. त्याला एक हजार रुपयांपर्यंतचे बंधन नसावे. - बाबा खोडवे, सचिव, मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स