शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडला एक कक्ष; दोन दावेदार

By admin | Updated: March 8, 2017 00:01 IST

वाद चिघळणार : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

गणपती कोळी --कुरूंदवाड -येथील पालिकेतील विरोधी पक्ष कक्षाचा वाद अद्यापही चालूच आहे. पालिकेतील विरोधी पक्षांनी उपनगराध्यक्ष कक्षावर लावलेला फलक चार दिवसांपूर्वी गायब झाला होता. त्यामुळे वाद संपला, असे मानले जात असताना विरोधकांनी सोमवारी केवळ कक्ष दरवाजावरच नव्हे, तर कक्षातील टेबल व कक्षामध्येही विरोधी पक्षनेत्यांचे फलक लावल्याने वाद पुन्हा चिघळणार, हे मात्र निश्चित झाले आहे. त्यामुळे ‘एक फुल दो माली’ याप्रमाणे ‘एक कक्ष दोन दावेदारां’ची चर्चा आता शहरापुरती नव्हे, तर तालुक्यात रंगली आहे. पालिका निवडणुकीत सत्तेपासून थोडक्यात हुकलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत लागली असली, तरी निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे जयराम पाटील नगराध्यक्ष आहेत. तर राष्ट्रवादीचे जवाहर पाटील उपनगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष थेट निवडीत ‘भाजप’चे उमेदवार रामचंद्र डांगे थोडक्यात पराभूत झाल्याने पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र, पक्षाला चांगले यश मिळवून दिल्याने स्वीकृत सदस्यांतून डांगे पुन्हा पालिकेत आले आहेत. त्यामुळे विरोधी भूमिका अधिक तीव्र होणार, अशी राजकीय तज्ज्ञांतून शक्यता वर्तविली असताना पहिल्याच सर्वसाधारण सभेत किरकोळ विषयांवरून बाचाबाची होऊन उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना डांगे यांनी मारहाण केली होती. डांगे यांनी मारहाण करून सभागृह हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच उपनगराध्यक्ष पाटील यांचा कक्ष विरोधी पक्षाला देण्याची मागणी डांगे यांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी विरोध केला होता. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी उपनगराध्यक्ष कक्षाच्या दरवाजावर विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर असा फलक लावला होता. चार दिवसांपूर्वी हा फलक अज्ञातांनी काढल्याने व पुन्हा विरोधकांकडून फलक न लावल्याने वाद मिटला, असा तर्क असताना सोमवारी सकाळी या कक्षाच्या दरवाजाबरोबरच कक्षातील टेबल व कक्षामध्येही विरोधी पक्षनेत्यांचे फलक लावल्याचे आढळून आले. त्यामुळे कक्ष वाद पुन्हा चिघळणार, हे निश्चित झाले आहे. पालिकेत ‘एक केबिन दोन दावेदार’ असा वाद चांगलाच रंगत आहे. विशेष सभेत निर्णयकाही दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी भाजपचे गटनेते रामचंद्र डांगे, नगरसेवक उदय डांगे यांनी किरकोळ विषयावरून उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना सभागृहातच मारहाण केल्याने नगराध्यक्षासह सत्ताधारी नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विरोधकांनी दबाव टाकून स्वत:च्या सोयीनुसार ठराव करून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी सत्ताधारी यांनी ठेवली आहे. त्यामुळे कक्ष मागणीवरून सभागृहाची विशेष सभा बोलाविण्याची शक्यता असून, तडजोडीने न मिटल्यास सत्ताधारी ऐनवेळी बहुमतावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.