कौलव येथे चरापले पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:48+5:302021-01-18T04:21:48+5:30
कौलव (ता. राधानगरी) येथे शिवराज चरापले व सीताराम चरापले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मान्यवरांनी ...

कौलव येथे चरापले पुण्यतिथी साजरी
कौलव (ता. राधानगरी) येथे शिवराज चरापले व सीताराम चरापले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
वसंतराव पाटील सिरसेकर म्हणाले, चांगल्या कामाचा ठसा उमटवून गेलेल्या लोकांच्या कामाचे अनुकरण करून पुढील जीवनात वाटचाल करूया.
यावेळी राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश पाटील म्हणाले, चांगले काम केलेल्या लोकांच्या पुण्यतिथी साजरी करतात. सीताराम चरापले व शिवराज चरापले तरुणाईला प्रेरणादायी आहेत. त्याच्या त्यागातून सहकार समूह निर्माण झाला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्धल शहाजी यादव, सागर पाटील, सयाजी पाटील, शिवाजी बनछोडे, कुसुम पाटील, आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्ही. आर. चरापले, बी. आर. चरापले, जी. बी. चरापले, पांडुरंग पाटील, बंडोपंत यादव, बाबुराव चरापले, सतीश चरापले, संदीप चरापले, सरपंच सविता चरापले, वृषाली पाटोळे, नम्रता पाटील, एम. डी. सुतार, दिनकर पाटील, प्रतिभा बनछोडे, के. द. पाटील, एच. डी. पाटील, विजय पाटील, शहाजी यादव, राजाराम जाधव, दत्तात्रय पाटील, आदींसह उपस्थित होते. भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी प्रास्ताविक केले. अशोक पाटोळे यांनी आभार मानले.
१७ कौलव चरापले पुण्यतिथी
फोटो ओळी : कौलव (ता. राधानगरी) येथील सीताराम चरापले यांया पुण्यतिथीनिमित्ताने सत्कार करताना सुशील पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, रवीश पाटील, सविता चरापले व मान्यवराच्या हस्ते कै. सीताराम चरापले, शिवाजी चरापले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.